Sunetra Pawar Flex News : राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर बारामतीत लागलेल्या एका फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरु आहे. होय मुख्यमंत्रीच असा सुनेत्रा पवारांचा बारामतीत फ्लेक्स लागला आहे.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा होय मुख्यमंत्रीच असा फ्लेक्स झळकला आहे. महाराष्ट्राचा पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय असा असं बॅनरवर छापण्यात आलं आहे. माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार होय मुख्यमंत्रीच. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय अशा असायचा बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. आजच जय पवारांनी या संदर्भात वक्तव्य केलं आणि वेगवेगळ्या राजकीय चर्चा घडू लागल्या त्यातच हा फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मुख्यमंत्री व्हायला मोठा जनाधार लागतो असे म्हणत मंत्री जयकुमार गोरेंनी जय पवारांचे कान टोचले. प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते आपला नेता मोठा व्हावा.पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमदाराची संख्या आणि पाठिंबा लागतो. पण आजची स्थिती पाहता 2029 मध्ये देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतीलदरम्यान ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरेच खासदार प्रणिती शिंदेंना देखील खोचक टोला लगावला. खासदार प्रणिती शिंदेंनी राहुल गांधीच्या घरासमोरच्या रस्त्याची काळजी करावी. सोलापुरात मोहोळ ते वळसंग महामार्ग 740 कोटी रुपयांच मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप आमदार सुभाष देशमुख आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यात श्रेयवाद सुरु आहे. यावर बोलताना भाजप नेते व ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरेनी खा. प्रणिती शिंदेंना टोला लगावला. तर नसरापूर घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितल्यावरून ही प्रणिती शिंदेवर गोरेंनी टीका केली. दिल्लीत निर्भया कांड घडलं होत. त्यावेळी सुशिलकुमार शिंदेनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता का? असा सवाल गोरेंनी केला. सुशील कुमार शिंदे हे देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक बलात्कार सारख्या घटना घडल्या होत्या. दिल्लीत निर्भया सारखा मोठा कांड झालेलं होतं. त्यावेळी सुशिलकुमार शिंदेंनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता का? असा सवाल गोरेंनी केला.