नाशिक TCS प्रकरणी सर्वाच मोठी अपडेट समोर, 20 दिवसांपासून फरार आरोपी निदा खानला अटक 
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा May 08, 2026 02:13 AM

Nashik TCS Crime News : नाशिकमधील बहुचर्चित 'TCS' कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला (Nida Khan) अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे. तिच्याकडेच धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार होती. पोलीस तिचा राज्यभर शोध घेतला होता. अखेर तिला अटक करण्यात आली आहे. 

निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली

निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे. निदा खान नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी होती. धार्मिक भावना दुखावणे आणि बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे असे निदा खानवर आरोप करण्यात आले होते. गेल्या 20 दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरु होता. निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केला होता. पण अखेर पोलिसांनी अटक केली आहे. निदा खानला रात्री कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेकडून कारवाई

नाशिकच्या TCS प्रकरणातील महिला आरोपी निदा खान 25 मार्च पासून फरार होती. त्यानंतर निदा खानच्या मागावर नाशिक पोलिसांची दोन पथके होती. TCS प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. छत्रपती  संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने निदा खानला अटक करण्यात आली आहे. नारेगाव कैसर कॉलनी मध्ये एका फ्लॅटमध्ये निदा खान वास्तव्यास होती. आई, वडील , भाऊ , मावशी  आणि निदा असे 5 जण एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. अखेर निदा खानला पोलिसांनी अटक केली आहे. 

 दानिश शेखच्या मोबाईलने उघडले गुपित

या प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलची तपासणी केली असता, SIT च्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. दानिशच्या मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ आढळून आले असून, या डिजिटल पुराव्यांचे आता सखोल विश्लेषण केले जात आहे. हे व्हिडिओ नेमके कशा संदर्भात आहेत आणि त्यातून कोणाचे चेहरे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik Crime News: फरार निदा खानचे 'कॉलिंग कनेक्शन', नोकरी सोडली तरीही आरोपींच्या संपर्कातच, दानिशच्या मोबाईलमधील संशयास्पद फोटो SIT च्या हाती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.