उन्हाळ्यात खाऊ नयेत ‘या’ धान्याच्या पोळ्या
Marathi May 09, 2026 09:25 PM

पोळी ,भाकरी, रोटी हा भारतीय खाद्यसंस्कृतीमधील महत्वाचा पदार्थ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की वर्षाचे १२ महिने सरसकट तेच तेच पदार्थ आहारात घेणे चुकीचे आहे. जसे की उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणारे आणि पचनास हलके पदार्थ खाणे गरजेचे आहे. पण याबदद्ल माहीती नसल्याने आपण काही पदार्थ बाराही महिने खातो. ज्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. या पदार्थांपैकी पोळी, रोटी, भाकरी या  बाराही महिने खाल्ल्या जातात. आज याच धान्यांबदद्ल आपण समजून घेणार आहोत.

मका
मक्याची रोटी आणि सरसों का साग ही डिश सगळ्यांच्याच आवडीची. पण उन्हाळ्यात मक्याची रोटी खाणे टाळावे .कारण मका हा उष्ण आहे. तर सरसो म्हणजे मोहरी ही देखील प्रकृतीने उष्ण आहे. यामुळे हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. म्हणून हिवाळ्यात थंडीत खाल्ले जातात. पण उन्हाळ्यात मका रोटी किंवा मक्याचे पदार्थ खाल्ले तर शरीरात उष्मता वाढते. यामुळे उन्हाळ्यात मका टाळावा.

बाजरी
बाजरी हे धान्य उष्ण आहे. त्यामुळे हिवाळ्यात, थंडीत बाजरीची भाकर आवर्जून खाल्ली जाते. पण उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढते. बध्दकोष्ठ, अॅसिडीटी,, तोंड येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात बाजरी खाणे टाळावे.

नाचणी
नाचणीमध्ये उष्ण तत्व असते. यामुळे जर उन्हाळ्यात नाचणीची भाकरी तुम्ही खात असाल तर तुमच्या पोटात गडबड होण्याची शक्यता आहे. यात पोटदुखीबरोबरच अपचनाचाही त्रास होऊ शकतो.

मल्टीग्रेन
काहीजण मल्टीग्रेन म्हणजे मिक्स धान्याच्या भाकरी खाणे पसंत करतात. पण प्रत्येक धान्याचे विशेष तत्व असते. यामुळे उन्हाळ्यात मल्टीग्रेनच्या पोळ्या किंवा रोटी अथवा भाकर खाणे टाळलेले बरे.

ज्वारी
ज्वारी थंड आहे. तसेच पचायला हलकी आहे.त्यामुळे उन्हाळाच नाही तर कोणत्याही सिझनमध्ये ज्वारी खाणे चांगलेच.

बारीक पीठ
मैदा पचायला जड आहे. त्यामुळे बद्धकोष्ठ, अॅसिटीडी आणि आळस येतो. त्यामुळे उन्हाळ्यात मैद्याच्या रोटी खाणे टाळावे.

गहू
ज्वारीप्रमाणेच गव्हाची पोळी खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच इतर धान्याच्या भाकरी किंवा रोटी तुम्ही नियमित खात असाल तर सिझननुसार त्यांचे आहारातील प्रणाम कमी जास्त करावे. जेणेकरून पोटाच्या समस्या उद्भवणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.