एसआयटीच्या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करणार असून त्यांना जी माहिती हवी असेल ती देणार आहे, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
Buldhana Live: बुलढाण्यातील धरणगावजवळ धावत्या ट्रकला भीषण आगबुलढाणा जिल्ह्यातील धरणगाव नदीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर जळगावकडून मलकापूरकडे येणाऱ्या HR 39 G8057 क्रमांकाच्या धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले व वाहतुकीवर परिणाम झाला. माहिती मिळताच मलकापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
Nana Patole : जसं एपस्टीनला मारलं, तसंच खरातला मारतील- नाना पटोलेजसं एपस्टीनला मारलं, तसंच खरातला मारतील....नाना पटोलेंचा खळबळजनक दावा.
ड्रग्ज प्रकरणात राज्य सरकारचे ४ मंत्री सामील...पटोलेंचा थेट आरोप.....
त्या ४ मंत्र्यांची नावं देणार, तात्काळ हकालपट्टी करण्याची पटोलेंची मागणी.....
विधिमंडळात दिलेल्या माहितीचा पटोलेंनी केला पुनरुच्चार....सरकारवर ओढले ताशेरे.
Nandurbar Live: नंदुरबार शहरात आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठानंदुरबार शहरवासीयांना पाणी कपातीच्या संकट आजपासून लागू होणार, आजपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने नंदुरबार पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.नंदुरबार शहराला दररोज सुमारे पंचाहत्तर लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या केवळ साठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला असून, आजपासून नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला असला तरी पालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असून, नागरिकांनी पाणी जपून आणि आवश्यकतेनुसारच वापरावे, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Jalgaon Live: जळगाव शहरातील तीन कॅफेंवर छापा; अश्लील चाळे करण्याला प्रोत्साहन दिल्याने गुन्हेशहरातील एम.जे. कॉलेज परिसरात तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन अवैध सायबर कॅफेंवर रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालक आणि चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एम.जे. कॉलेज परिसरातील काही कॅफेंमध्ये अल्पवयीन तसेच तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी खासगी जागा (कॅबिन) उपलब्ध करून दिली जाते, अशी गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने पोलिसांच्या दामिनी पथकासह संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
Thalapathy Vijay Oath Ceremony: दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयसह ९ मंत्र्यांनी घेतली शपथदाक्षिणात्य अभिनेता थलापती विजय यांनी आज तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत ९ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तामिळनाडूमधील या भव्य शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवातविजय यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात
विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशाने उपस्थिती दर्शवली आहे. थोड्याचवेळात होणार शपथविधी
पुण्यात चार दिवसात सहा अल्पवयीन मुली बेपत्ताLatest Marathi Live Updates 10 may 2026 : पुण्यात चार दिवसात सहा अल्पवयीन मुली बेपत्ता पुणे शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल, सर्व मुली अल्पवयीन असल्याची माहिती यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...