मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, मोठा हाहाकार, बीएसएफने तब्बल..
GH News May 10, 2026 11:11 AM

मागील काही दिवसांच्या तुलनेत भारत आणि बांगलादेशचे संबंध सध्या स्थिर आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात होते. हेच नाही तर हिंदूंवर मोठे अत्याचार बांगलादेशमध्ये होत होते. भारतीय दूतावासावरही मोठा हल्ला करण्यात आला. यादरम्यानच आता भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्याने एकच खळबळ उडालीये. भारत आणि बांगलादेशाची सीमा नद्यांनी, जंगलांनी आणि पर्वतांनी जोडलेली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा भागांवर लक्ष ठेवणे म्हणजे मोठे आव्हान आहे. बीएसएफकडून 24 तास डोळ्यात तेल ओतून सुरक्षा केली जाते. अतिक्रमण आणि अवैध कारवायांवर बीएसएफचे बारीक लक्ष असते. त्यामध्येच बांगलादेशची सीमा तस्करी आणि घुसखोरीसाठी ओळखली जाते. मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न कायमच बांगलादेशातून होतो.

मिळालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री त्रिपुराच्या सेपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि तस्करांमध्ये मोठी चकमक झाली. काही काळ सीमेवर तणावाचे वातावरण होते. या चकमकीत दोन बांगलादेशी नागरिक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बीएसएफने मोठा दावा केला. बीएसएफने स्पष्ट सांगितले की, जवानांनी त्यांच्या आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला.

ही घटना कमलासागर सीमा चौकीजवळ घडली. हा भाग तस्करी कारवायांसाठी संवेदनशील आहे. भारतात मोठ्या प्रमाणात याच भागातून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जातो. बीएसएफच्या एका गस्ती पथकाने रात्री उशिरा सीमेवरील कुंपणावरून माल वाहून नेणाऱ्या सुमारे 10 ते 15 लोकांच्या गटाला पाहिले. त्यानंतर लगेचच बीएसएफकडून कारवाई करण्यात आली. दोन्ही बाजूने जोरदार चकमक झाली.

भारतीय सैनिकांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, बीएसएफवर तस्करांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. बीएसएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोळीबाराला सुरूवात झाली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बीएसएफकडून अगोदरच या घटनेवर स्पष्टीकरण देण्यात आले. बीएसएफ जवानांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. मृतांची ओळख 20 वर्षीय नवीन हुसेन आणि 40 वर्षीय मोहम्मद मुरसलीन अशी पटली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.