भंडारा: आंबेडकर वॉर्ड येथे राहत असलेल्या भाडेकरूच्या ताब्यातून पोलिसांनी १२ लाख ६५ हजार रुपयांची एमडी पावडर जप्त केली आहे. या कारवाईतून शहरात अमली पदार्थाचा नागपूरवरून होत असल्याचे उघड झाले असून, आता पोलिस यातील मुख्य सूत्रधारांच्या मागावर आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी शहरात लपून छपून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवसायिकांचे कंबरडे मोडण्याकरिता व समाजात नशेची लत लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा विडा उचलला आहे. यातूनच स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक अमली पदार्थाच्या व्यावसायिकांचा शोध घेत होते.
Vidarbha News: नवेगावबांधमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ आणि धान-मका नुकसानाची भीती; मका व धान गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची ताडपत्री झाकणारी धांदलदरम्यान, शुक्रवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिरिष भालेराव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना दिली.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांना तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेची टीम तयार करण्याचे आदेश दिले. त्यावरून अपर पोलिस अधीक्षकांनी पथकाला सूचना देऊन पुढील कारवाईसाठी रवाना केले.
थलपथी विजय यांच्या खास पाहुण्या ठरल्या पार्टनर त्रिशा कृष्णन; ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार, पत्नी-मुलं शपथविधीतून गायबस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिरिष भालेराव यांनी कारवाईसाठी पथक तयार करून पंच, राजपत्रित अधिकारी यांच्यासह आंबेडकर वॉर्ड येथील समाज भवनाजवळील पुरुषोत्तम रामटेके यांचे घरी असलेल्या भाडेकरूच्या खोलीत छापा टाकला. येथे भाड्याने राहत असलेला कपिल गंगाधर खोब्रागडे (रा. नंदनवन, नागपूर) याच्या घरी ६३.२१० ग्रॅम एमडी सदृश पावडर (अंदाजे किंमत १२ लाख, ६५ हजार रुपये), इतर साहित्य व रोख ७९ हजार, ९६० रुपये असा एकूण १३ लाख, ४७ हजार, २६० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. याबाबत भंडारा पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन , अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिरिष भालेराव, सहायक पोलिस निरीक्षक केशव पुंजरवाड, पोलिस हवालदार रमेश बेडुरकर, राजेश पंचबुद्धे, प्रशांत कुरंजेकर, अजय बारापात्रे, कीर्ती तिवारी, अंकेश पुराम, कृष्णाल कडू, योगेश दबाले, अमोल खराबे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव पुंजरवाड हे करीत आहे.