Tamil Nadu cabinet expansion : तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांनी नुकतीच शपथ घेतली. विजय यांच्यासोबत तमिळनाडू मंत्रिमंडळासाठी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली. लोक भवन, तमिळनाडू येथून १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.
प्रसिद्धीपत्रकानुसार, मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित विजय यांनी ९ मे रोजी मंत्रिमंडळातील नऊ सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर तमिळनाडूचे राज्यपाल यांनी या शिफारसीला मान्यता दिली.
मंत्रिपदासाठी मंजुरी मिळालेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
N. Anand — एन. आनंद
Aadhav Arjuna — आधव अर्जुना
Dr. K.G. Arunraj — डॉ. के. जी. अरुणराज
K.A. Sengottaiyan — के. ए. सेंगोट्टैयन
P. Venkataramanan — पी. वेंकटरमणन
R. Nirmalkumar — आर. निर्मलकुमार
Rajmohan — राजमोहन
Dr. TK. Prabhu — डॉ. टीके प्रभू
S. Keerthana — एस. कीर्तन
या नव्या मंत्रिमंडळामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात असून, शपथविधीनंतर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. Tamilaga Vettri Kazhagam (टीव्हीके) पक्षाने बहुमताच्या जवळ पोहोचत महत्त्वाची राजकीय ताकद दाखवली. त्यानंतर विविध पक्ष आणि अपक्ष आमदारांशी चर्चा सुरू झाली. विशेषतः काँग्रेस, व्हीसीके आणि आययूएमएलच्या पाठिंब्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाला बळ मिळाले.
Thalapathy Vijay swearing in CM : मुख्यमंत्री थलपती विजय, आई, वडिलांच्या डोळ्यात पाणी; साथीला राहुल गांधी, कार्यकर्त्यांचा जल्लोषदरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठीविजय यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही चेन्नईत पोहोचून विजय यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय स्तरावरही तमिळनाडूच्या राजकारणाची चर्चा रंगली. ९ मे रोजी विजय यांनी राज्यपालांकडे मंत्रिमंडळासाठी नऊ सदस्यांची यादी सादर केली.
१० मे रोजी राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली. नव्या मंत्रिमंडळात युवा चेहरे, व्यावसायिक आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईतील शपथविधी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता खातेवाटप आणि सरकारच्या पहिल्या निर्णयांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.