नवेगावबांध: शनिवारी (ता.९) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येथे व परिसरात विजांचा कडकडाटासह वादळी वारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून मका व धान पीक ओले होण्यापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली. अवकाळी पावसाच्या सावटाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या परिसरात मका व धान मळणी सुरू आहे.शेतकऱ्यांनी आपले धान व मका वाळवण्याकरता रस्त्यावर,अंगणात शेतात ठेवला आहे.एक मे पासून मका खरेदी केंद्र सुरू होतील अशी घोषणा जिल्हा प्रशासनाने केली असली तरी अद्यापही मका खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे मका वाळू घालण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर अंगणात शेतात ठेवला आहे. अचानक वादळ वारा विजांचा कडकडाट व अकाली पावसाने सुरुवात झाल्यामुळे पावसापासून शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
Nagpur News: आता ग्राहकांसमोरच सिलिंडरची वजन तपासणी; गॅस कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशपरंतु आज सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्याला व विजांच्या कडकडाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.पावसापासून शेतमाल ओला होण्या पासून वाचविण्यासाठी धान व मका गोळा करणे त्यावर ताडपत्री झाकणे ही कामे करताना शेतकऱ्यांची त्रेधात्रीपट झाली.मका व धार्मिक मळणीला व तोडणीला परिसरात सुरुवात झाली आहे.
अशातच अवकाली पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हातात तोंडी आलेला घास निसर्गाच्या कृपेमुळे हिरावला जाणार का? ही चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Vidarbha News: देऊळगाव राजातील मुख्यमार्गावर अग्नी तांडव; सात दुकाने भस्मसातः सुमारे ५० लाखांचे नुकसान तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरीयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग तिसर्या दिवशीही हजेरी लावली. शनिवारी (ता. नऊ) पहाटे जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. साधारणतः अर्धा ते एक तास पाऊस कोसळला. सलग कोसळणार्या पावसामुळे भाजीपाला, फळबाग, तीळ आदी पिकांना फटका बसत आहे. तर शेतशिवारात काढून ठेवलेल्या पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु आपत्ती विभागाकडे नुकसानीची कुठलीही नोंद घेण्यात आली नाही. दरम्यान, शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारच्या सुमारास उन्ह तापले होते. परंतु सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता.