OTT Release This Week: बुधवार आला की विकेंडची चाहूल लागायला सुरुवात होते. आठवडाभराच्या धावपळीनंतर दोन दिवस मोकळेपणाने कसे घालवायचे, याचा प्लॅन अनेक जण बनवू लागतात. काहीजण फिरायला जाण्याचा बेत आखतात, तर काही मित्र-परिवारासोबत वेळ घालवतात. पण अनेकजण असेही असतात, ज्यांना घरात आराम करत आपल्या आवडत्या वेबसीरिज आणि चित्रपटांचा बिंज-वॉच करायला जास्त आवडतं. तुम्हीही हाच विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 13 मे ते 19 मे दरम्यान OTT वर मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे.या आठवड्यात काही दमदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत.
रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘Dhurandhar: The Revenge’ अखेर OTT वर धडक देणार आहे. १५ मे रोजी JioHotstar वर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात रणवीर पुन्हा एकदा अंडरकव्हर स्पायच्या भूमिकेत दिसणार आहे. 26/11 हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये घुसलेल्या जसकीरत सिंग रंगीची ही कथा अधिक रक्तरंजित आणि धोकादायक मिशन घेऊन येणार आहे. अॅक्शन, राजकारण आणि दहशतवादाच्या खेळात रणवीरचा हा अवतार प्रेक्षकांना हादरवणार असल्याचं बोललं जात आहे.चित्रपटात सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन हे कलाकार पुन्हा आपल्या भूमिकेत दिसणार आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमागचं काळं वास्तव उघड करणारी ‘Exam’ ही सिरीज १५ मे रोजी Prime Video वर रिलीज होणार आहे. एका रहस्यमय तरुणीची ही कथा भ्रष्ट यंत्रणेविरुद्धचा स्फोटक संघर्ष दाखवणार आहे. पेपर लीक, राजकीय दबाव आणि सत्तेच्या गलिच्छ खेळामुळे ही सिरीज सध्या चर्चेत आली आहे. थरार आणि सामाजिक वास्तव यांचा जबरदस्त संगम असलेली ही सिरीज प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे.या चित्रपटात रसिका दुगल, संजय मिश्रा, झाकीर हुसेन, मनीष चौधरी आणि सौरभ द्विवेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमागचं काळं वास्तव उघड करणारी ‘Exam’ ही सिरीज 15 मे रोजी Prime Video वर रिलीज होणार आहे. एका रहस्यमय तरुणीची ही कथा भ्रष्ट यंत्रणेविरुद्धचा स्फोटक संघर्ष दाखवणार आहे. पेपर लीक, राजकीय दबाव आणि सत्तेच्या गलिच्छ खेळामुळे ही सिरीज सध्या चर्चेत आली आहे. थरार आणि सामाजिक वास्तव यांचा जबरदस्त संगम असलेली ही सिरीज प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे. 7 भागांची ही वेबसीरिज 15 मे रोजी Prime Video वर रिलीज होणार आहे.
अभिनेत्री दुशारा विजयन एका रहस्यमय भूतकाळ असलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. अन्याय, महत्त्वाकांक्षा आणि सत्तेच्या खेळामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. या सीरिजमध्ये अदिती बालन, अब्बास, वसुंधरा कश्यप आणि नरेन मणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
गोळ्यांचा पाऊस, गँगवॉर आणि गुन्हेगारीच्या साम्राज्याविरुद्ध रणदीप हुड्डाचा जबरदस्त अवतार! ‘इन्स्पेक्टर अविनाश सिझन 2’ 15 मे रोजी JioHotstar वर रिलीज होणार आहे. वास्तविक घटनांवर आधारित या सिरीजमध्ये रणदीप हुड्डा पुन्हा एकदा निर्भीड एन्काऊंटर स्पेशालिस्ट अविनाश मिश्रा बनून परततोय. यावेळी अविनाश बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या नेटवर्कविरुद्ध लढताना दिसणार आहे. मात्र त्याचवेळी त्याचा मुलगा खून प्रकरणात अडकल्याने त्याचं वैयक्तिक आयुष्यही हादरून जातं. अॅक्शन, थरार आणि इमोशनल ड्रामाचा तुफान डोस असलेला हा सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.