आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला मुंबई इंडियन्स हा जेतेपदासाठी फेव्हरेट मानला जात होता. मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्सने भविष्य वर्तवणारे आणि चाहत्यांचा हिरमोड केला. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असून पराभवाची मालिका सुरू राहिली आहे. अखेर 11 सामन्या खेळ झाल्यानंतर स्पर्धेतून आऊट झाले. मुंबई इंडियन्ससोबत लकनौ सुपर जायंट्स संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे. पण औपचारिक म्हणून या दोन्ही संघांना तीन सामने खेळायचे आहेत. कारण प्रत्येक संघाला साखळी फेरीत 14 सामने खेळणं भाग आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या 8 पैकी काही संघांचं स्वप्न भंग करू शकतात. मुंबई इंडियन्सच्या रडारवर तीन संघ आहेत. तिन्ही संघ प्लेऑफच्या चुरशीच्या लढाईत आहे. त्यामुळे एक पराभवही टॉप 4 मधील स्थान गमवण्यास पुरेसा आहे. चला जाणून घेऊयात मुंबई इंडियन्समुळे कोणत्या तीन संघांचं प्लेऑफचं गणित चुकू शकतं.
मुंबई इंडियन्सचं तीन सामने शिल्लक असून 14 मे रोजी पंजाब किंग्स 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना आहे. खरं तर हे तिन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पंजाब किंग्सने 11 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय, 4 सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्सला तीन पैकी दोन सामने जिंकणं भाग आहे. मुंबई इंडियन्सने पंजाब किग्सला पराभूत केलं तर पुढचं गणित किचकट होऊ शकतं. टॉप 4 मधील स्थान गमवावं लागू शकतं.
मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी आहे. खरं तर कोलकाता नाईट रायडर्सला या स्पर्धेतून बाद होण्यासाठी एक पराभव खूप आहे. कारण 16 गुणांचं गणित सुटणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. कोलकात्याने 10 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यात विजय, 5 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे 9 गुणांसह 8व्या स्थानी आहे. त्यामुळे एक पराभव आणि स्पर्धेतून पत्ता कट होईल.
मुंबई इंडियन्सचा तिसरा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सशी आहे. राजस्थान रॉयल्सने 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय आणि पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे तीन पैकी 2 सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या तीन संघांचं गणित बिघडवू शकते.
लखनौ सुपर जायंट्सही प्लेऑफचं शर्यतीत असलेल्या संघामध्ये स्पीडब्रेकर ठरू शकतो. लखनौचा 15 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सशी सामना, 19 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी सामना आणि 23 मे रोजी पंजाब किंग्सशी सामना आहे. या तिन्ही संघांना लखनौ सुपर जायंट्सची धास्ती असेल. कारण लखनौकडे गमवण्यासाठी काहीच नाही.