GT vs SRH Toss : गुजरातची अहमदाबादमध्ये बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध किती धावा करणार?
GH News May 12, 2026 10:11 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा 12 वा सामना आहे.सामन्याचं आयोजन हे गुजराच टायटन्सचा होम ग्राउंड अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला घरच्या मैदानात बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता शुबमन गिल याच्या नेतृत्वाच गुजरात किती धावा करण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.