आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चढाओढ आहे. प्लेऑफच्या 4 जागांसाठी 8 संघांत थेट सामना आहे. प्रत्येक सामना हा निर्णायक असा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला इथून एकही चुक महागात पडू शकते. तसेच वैयक्तिक पातळीवर खेळाडूंमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरस आहे. प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचा दावेदार बदलत आहे. 1-1 धाव आणि 1-1 विकेटनंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचां समीकरण बदलतंय. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5मध्ये 4 भारतीय फलंदाज आहेत. मात्र एकमेव विदेशी फलंदाज हा पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर भारतीय खेळाडूच्या डोक्यावर ऑरेंज कॅप मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील हेन्रिक क्लासेन याचा अपवाद वगळता इतर 4 फलंदाज हे ओपनर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा हेन्रिक क्लासेन पहिल्या स्थानी आहे. क्लासेन मिडल ऑर्डरमध्ये खेळूनही त्याने पहिलं स्थान मिळवलं आहे. क्लासेनने 11 सामन्यांत 494 धावा केल्या आहेत. त्यामुळे क्लासेन गुजरात विरुद्ध 12 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सहज 500 धावांचा टप्पा पार करु शकतो. क्लासेन याच्यानंतर दुसर्या स्थानी दिल्ली कॅपिट्ल्सचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल दुसऱ्या स्थानी आहे. केएलने 12 सामन्यांत 477 धावा केल्या आहेत.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये हेन्रिक क्लासेन व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा याचा समावेश आहे. अभिषेक तिसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने 11 सामन्यांत 475 धावा केल्या आहेत.
तसेच चौथ्या स्थानी गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल चौथ्या स्थानी विराजमान आहे. शुबमनने 10 सामन्यांत 462 धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पाचव्या क्रमांकावर आहे. वैभवने 11 सामन्यांत 440 धावा केल्या आहेत.
दरम्यान पर्पल कॅपच्या शर्यतीत आरसीबीचा भुवनेश्वर कुमार पहिल्या स्थानी आहे. भुवीने 11 सामन्यांत 21 विकेट्स मिळवल्या आहेत. भुवीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा अंशुल कंबोज दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंशुलने 11 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.