Marathi Movie Baipan Bhari Deva Lifetime Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) हिंदी सिनेमांपेक्षाही (Hindi Movie) मराठी सिनेमे (Marathi Movie) धुमाकूळ घालत आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा (Raja Shivaji) चांगलाच गाजला. या सिनेमानं नुकतीच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत नवा इतिहास रचलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्यगाथा सांगणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण, तुम्हाला माहितीय का? एक अशी मराठी फिल्म आहे, जी फक्त 5 कोटींमध्ये बनलेली, पण तिनं तब्बस 1700 टक्क्यांचा नफा मिळवून देत मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला. एवढंच काय तर या सिनेमानं अनेक रेकॉर्डही आपल्या नावावर केलेले.
आम्ही ज्या सिनेमाबाबत बोलतोय, त्या सिनेमाचं नाव 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva). केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमानं चांगलीच प्रसिद्धी मिळवलेली. या सिनेमात मराठीतल्या लेडी सुपरस्टार्सची मांदियाळी झळकलेली. या सिनेमाची कथा, संवाद आणि सिनेमातल्या कलाकारांचे अभिनया या सर्वच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. या सिनेमानं रिलीज होताच, बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलेलं आणि निर्मात्यांची चांदी करुन दिलेली.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटानं 90 कोटींचं वर्ल्डवाइड कलेक्शन केलेलं. तर, भारतात तब्बल 76.28 कोटींचं कलेक्शन केलेलं. फक्त 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला या सिनेमानं 1700 टक्के प्रॉफिट कमावलं.
'बाईपण भारी देवा' चित्रपटानं बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलेलं. या सिनेमाला पॉजिटिव वर्ड ऑफ माउथचा मोठा फायदा झाला. 'बाईपण भारी देवा'चं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं. यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमात कोणताही मेल लीड नव्हता. तर, सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठी धम्माल केलेली आणि तो ब्लॉकबस्टरही ठरलेला. सिनेमात 6 बहिणींची कहाणी दाखवण्यात आली असून सुरूवातीला त्यांच्यात वाद होतो पण नंतर कहाणीत वेगळा ट्विस्ट येतो.