Mahavitran Electricity : राज्यभरात वीजचोरी आणि तांत्रिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वीजगळती होत असते. अशातच आता महावितरणच्या (Mahavitaran) 800 कोटींच्या वीजगळतीचा फटका थेट ग्राहकांना बसत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी 1,500 ते 1,700 कोटींहून अधिकचे युनिट वीज वितरण होत असतं. त्यापैकी 15 टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे 250 कोटी युनिट वीजगळती होत असते. या वीजगळतीची किंमत तब्बल 700 ते 800 कोटी रुपयांपर्यंत असून त्याचा भुर्दंड वीजदरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांवर बसणार आहे. (Power Leakage/Loss)
महावितरणच्या म्हणण्यानुसार, एमईआरसीकडून 15 टक्क्यांहून कमी वीजगळती असावी असे निर्देश आहेत. त्या दृष्टीनेच आमचे प्रयत्न असून वीजगळती कमी करण्याचा प्रयत्न असतो. असं असलं तरी या सर्वाचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार असून ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पुढील पाच वर्षांसाठी मंजूर वीजगळती (Power Leakage/Power Loss)
2025-26 - 17 टक्के
2026-27 - 15.5 टक्के
2027-28 - 14 टक्के
2028-29 - 12.5 टक्के
2029-30 - 11 टक्के
गळतीची प्रमुख कारणे
- ग्रामीण भागात बेकायदा विजेचा गैरवापर
- जुनी झालेली वीज वितरण यंत्रणा
- नोंदणीच्या तुलनेत वाढीव हॉर्स पॉवरच्या कृषिपंपाची जोडणी
- राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेले वितरण जाळे
Dharashiv News : गॅस टंचाई , डिझेल टंचाई पाठोपाठ धाराशिव मध्ये वीज टंचाई
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मोहा परिसरात शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने मोठ्या समस्येला समोर जावं लागत आहे. विजेच्या अभावी शेतातली उभी पिक करपण्याची वेळ आली आहे. विहिरीत थोडं असलेलं पाणी पिकांना द्यावं आणि पीक जगवावी, कसं वाटत असलं तरी ते शक्य नसल्याने शेतकऱ्याला मोठा प्रश्न पडला आहे. राजकीय पुढाऱ्यांचं वीज प्रश्नाकडे लक्ष नाही, प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यामुळे वाढत्या उन्हात विज टंचाईमुळे शेती पिकांना फटका बसत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.