पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना खाद्यतेल आणि पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांना देशावरील आगामी आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel Price) भाव कडाडले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात आधी वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीमुळे (Fuel Price hike) सामान्य जनता आणि व्यावसायिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. (Petrol and Diesel Price Hike in India)
पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले तेव्हाच आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील, याचा अंदाज आला होता. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचा तुटवडा निर्माण होऊन दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीयांनी सोने खरेदी, इंधन बचत आणि खाद्यतेलाची बचत या त्रिसूत्रीचे कसोशीने पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे भारतामधील पेट्रोलियम कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी या तोट्याचा काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकदमच मोठी दरवाढ केल्यास सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण होऊ शकतो. हीच गोष्ट ध्यानात घेऊन पेट्रोलियम कंपन्यांकडून आता टप्प्याटप्याने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली जात आहे. एकावेळी मोठी दरवाढ नंतर मधल्या काळात काही पैशांची दरवाढ असे सूत्र वापरुन पेट्रोलियम कंपन्या हळूहळू त्यांना तोटा भरुन काढण्यासाठी अपेक्षित असलेल्या पातळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत नेतील, असा अंदाज आहे.
15 मे- पेट्रोल- 3 रुपये, डिझेल- 3.11 रुपये
19 मे- पेट्रोल- 87 पैसे, डिझेल- 90 पैसे
23 मे- पेट्रोल- 90 पैसे, डिझेल- 91 पैसे
25 मे- पेट्रोल- 2.61 रुपये, डिझेल 2.17 रुपये
गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात एकूण 7 रुपये 38 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 7 रुपये 09 पैशांची वाढ झाली आहे.
Petrol-Diesel Price Hike: राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर
पेट्रोल: नवीन दर 111.12 रुपये/लिटर, जुना 108.39 रुपये/लिटर
दरवाढ 2.73 रुपये
डिझेल: नवीन दर 97.68 रुपये/लिटर, जुना 94.97
दरवाढ 2.81रूपये
——————————————————————
नागपूर मध्ये पेट्रोल 2.72 पैशाने वाढले सध्या पेट्रोल 111.70 रुपये झाले
तर डिझेल 2.81 पैशानी वाढले डिझेल चे नवीन दर 98.76 रुपये झाले.
——————————————————————
सोलापूर पेट्रोल/डिझेल दर
जुने –
पेट्रोल – 109.14
डिझेल – 95.74
आज –
पेट्रोल – 111.87
डिझेल – 98.55
——————————————————————
पेट्रोल
कालावधी – 109.36
आज – 111.77
डिझेल
वेळ – 96.08
आज – 98.46
——————————————————————
भंडारा : पेट्रोल / डिझेल दर
109.60 (पेट्रोल जुना दर)
112.32 (पेट्रोल नवा दर)
96.18 (डिझेल जुना दर)
98.99 (डिझेल नवा दर)
——————————————————————
बुलढाणा – पेट्रोल 112.49 ( आजचा ) / 2.72 वाढल
डिझेल – 99.16 ( आजचा ) / 2.81
अहिल्यानगर
जुने दर
पेट्रोल 108.87
डिझेल 95.47
नवीन दर
पेट्रोल- 111.60
डिझेल- 98.27
ठाणे पेट्रोल डिझेल दरवाढ
पेट्रोल
१०८.५४/१११.२७=२.७०
डिझेल
९५.१२/९७.९२=२.८०
पेट्रोल आणि डिझेल दर
कालचे दर
पेट्रोल: 110.45
डिझेल : 97.03
आजचे दर
पेट्रोल: 113.18
डिझेल : 99.83
कोल्हापूर
पेट्रोल- 112.19 रुपये
डिझेल- 98 रुपये 86 पैसे
आणखी वाचा
आणखी वाचा