उन्हाळा आता फक्त “गरमीचा ऋतू” राहिलेला नाही, तर तो शरीराची खरी परीक्षा घेणारा काळ बनत चालला आहे. सकाळी 10 नंतर घराबाहेर पडताना येणारा उष्ण वारा, काही मिनिटांत अंगातून वाहू लागणारा घाम आणि सतत जाणवणारी बेचैनी हे सगळं आता सामान्य झालं आहे. पण या वाढत्या तापमानामागे एक असा प्रश्न दडलेला आहे, जो प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे माणसाचं शरीर किती उष्णता सहन करू शकतं? (body heat tolerance human body temperature limit heatwave death risk)
अनेकदा आपण “आज 45°C तापमान आहे असं सहज बोलतो. पण खरं म्हणजे या तापमानानंतर शरीराच्या आत एक धोकादायक प्रकिया सुरु होते. शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी झगडत राहतं आणि एका मर्यादेनंतर ही नैसर्गिक यंत्रणाच बंद पडू लागते. याच टप्प्यानंतर वाढतो मृत्यूचा धोका.
शरीराची ‘नैसर्गिक AC सिस्टम’ कशी काम करते?
मानवी शरीराचं सामान्य तापमान सुमारे 37°C असतं. हे तापमान नियंत्रणात ठेवण्याचं काम मेंदूमधील ‘हायपोथॅलेमस’ हा भाग करतो. बाहेर उष्णता वाढली की शरीर घामाच्या स्वरूपात उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. घाम त्वचेवरून वाफ बनून उडतो आणि शरीर थंड होतं. त्यामुळेच गरमीत घाम येणं ही वाईट गोष्ट नसून शरीराची संरक्षण प्रक्रिया असते. पण हीच यंत्रणा काही परिस्थितीत पूर्णपणे फेल होऊ शकते.
किती तापमानापर्यंत माणूस सुरक्षित असतो?
तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्ती साधारण 35°C ते 40°C पर्यंतचं बाहेरील तापमान सहन करू शकते. मात्र 40°C नंतर शरीरावरचा ताण वेगाने वाढू लागतो.
कोरडी उष्णता असेल तर काही काळासाठी 45°C ते 50°C पर्यंत तापमान सहन होऊ शकते. पण सतत उन्हात राहणं, पाणी कमी पिणं किंवा शरीर थंड न ठेवणं धोकादायक ठरू शकतं 50°C च्या पुढे तापमान गेलं की शरीरातील अवयवांवर गंभीर परिणाम सुरू होऊ शकतात. विशेष म्हणजे वृद्ध व्यक्ती, लहान मुलं, हृदयविकार किंवा मधुमेह असलेले रुग्ण यांच्यासाठी हा धोका अधिक असतो.





