Solapur Barshi Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या पत्नीची चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या करून आरोपी पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. बार्शी शहराजवळील बार्शी-परंडा रोडवर आज दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेनं बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कौटुंबिक करणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील याने आपल्या पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली. वाद चिघळताच संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या धनश्री पाटील हिचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश आणि धनश्री हे दोघेही खाजगी बँकेमध्ये काम करत होते. याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपी ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यात आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार चारित्र्याच्या संश्यातून आरोपी ऋषिकेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ऋषिकेश आणि धनश्री यांचा काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता.