Donald Trump US Iran War: इराण-अमेरिका कराराबाबत (US Iran War) अनिश्चितता कायम आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला निर्वाणीचा इशारा देत युरेनियम'बाबत मोठं वक्तव्य केले आहे. अमेरिकेसमोर तात्काळ शरणागती पत्करा किंवा तिथेच नष्ट करा' अशा शब्दात ट्रम्प यांनी करारापूर्वी इराणला अल्टिमेटम (US Iran War) दिला आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेच्या लष्कराने दक्षिण इराणवर नवीन हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र तळांना आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोटींना लक्ष्य करण्यात आले असून, ही कारवाई 'आत्मसंरक्षणा'ची असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबतचे तीन महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी संभाव्य करारावर चर्चा करण्याकरिता तेहरानचे वरिष्ठ अधिकारी कतारच्या पंतप्रधानांसोबत दोहा येथे उपस्थित असतानाच हे हल्ले झाले आहे. (Donald Trump US Iran War)
US Army: युद्धविरामादरम्यान संयम बाळगून आमच्या सैन्याचे संरक्षण करत
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) एका निवेदनात म्हटले आहे की, हे नवीन हल्ले "आत्मसंरक्षणा"साठी, "इराणी सैन्याकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून आमच्या सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी" करण्यात आले आहेत. अमेरिकन संस्थेनुसार, या लक्ष्यांमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि 'सुरुंग पेरण्याचा' प्रयत्न करणाऱ्या बोटींचा समावेश होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते टिम हॉकिन्स म्हणाले की, अमेरिकन सैन्य 'सध्याच्या युद्धविरामादरम्यान संयम बाळगून आमच्या सैन्याचे संरक्षण करत आहे'. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की अमेरिकेचे लक्ष्य बंदर अब्बासजवळील एक क्षेत्र होते. बंदर अब्बास हे दक्षिणेकडील एक बंदर शहर असून, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वसलेल्या इराणच्या नौदल तळाचे ठिकाण आहे.
Donald Trump : सर्व देशांनी किमान एकाच वेळी 'अब्राहम करारा'वर स्वाक्षरी करणे अत्यावश्यक
या विषयी बोलताना ट्रम्प म्हणाले, "शनिवारी सौदी अरेबियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन सलमान अल सौद, संयुक्त अरब अमिरातीचे मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, कतारचे अमीर तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी, पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम बिन जाबेर अल थानी आणि मंत्री अली अल-थवादी, पाकिस्तानचे फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर अहमद शाह, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय आणि बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा यांच्यासोबत झालेल्या माझ्या चर्चेदरम्यान मी सांगितले की, हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने केलेले प्रयत्न पाहता, या सर्व देशांनी किमान एकाच वेळी 'अब्राहम करारा'वर स्वाक्षरी करणे अत्यावश्यक आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "चर्चा झालेले देश म्हणजे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त, जॉर्डन आणि बहरीन. यापैकी एक किंवा दोन देशांकडे असे न करण्याची कारणे असू शकतात आणि ते कारण स्वीकारले जाईल, परंतु बहुसंख्य देशांनी इराणसोबतच्या या कराराला, तो अन्यथा जितका ऐतिहासिक ठरला असता त्यापेक्षा, अधिक ऐतिहासिक बनवण्यासाठी तयार, इच्छुक आणि सक्षम असले पाहिजे."
Iran: "अमेरिकेसोबत कोणताही करार होण्याची चिन्हे नाहीत
दरम्यान या बाबत बोलताना इराणने म्हटले आहे की, अमेरिकेसोबत लवकरच कोणताही करार होणार नाही. इराणने सोमवारी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असली तरी, करार तात्काळ होण्याची शक्यता नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकी यांनी ही टिप्पणी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच करार होऊ शकतो, असे दावे केल्यानंतर केली आहे. रुबियो यांनी म्हटले होते की, दोन्ही देशांमध्ये करार शक्य आहे.
हे सुद्धा वाचा: