ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; रवींद्र फाटक ठाकूर पिता-पुत्रांच्या भेटीला, कुणाला
Marathi May 26, 2026 01:25 PM

रवींद्र पाठक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली: ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु असताना आता सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या रवींद्र फाटक (Ravindra Pathak) यांनी आज बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली. रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बविआचे क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यादरम्यान, रवींद्र फाटक यांनी ठाकूर पिता-पुत्रांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे. (Ravindra Pathak Meets Hitendra Thakur And Kshitij Thakur)

ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ठाणे विधान परिषदेतून शिवसेनेकडून रवींद्र फाटकही इच्छुक आहेत. वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत. बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास फायदा शिवसेनेला होईल. मात्र ठाणे विधान परिषेदेसाठी रवींद्र फाटक आणि क्षितिज ठाकूर यांच्यातून अंतिम उमेदवार कोण असणार, याबाबत एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार आहेत. (Ravindra Pathak Meets Hitendra Thakur And Kshitij Thakur)

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका- (Vidhan Parishad Election 2026)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूरअहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणेभंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

पुढील मतदारसंघासाठी विधान परिषदेची निवडणूक होणार- (Vidhan Parishad Election 2026)

  1. सोलापूर
  2. अहिल्यानगर
  3. ठाणे
  4. जळगाव
  5. सांगलीसातारा
  6. नांदेड
  7. यवतमाळ
  8. पुणे
  9. भंडारागोंदिया
  10. रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग
  11. नाशिक
  12. वर्धाचंद्रपूरगडचिरोली
  13. अमरावती
  14. धाराशिवलातूरबीड
  15. परभणी-हिंगोली
  16. छत्रपती संभाजी नगर-जालना
  17. नागपूर

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून

संबंधित बातमी:

Vidhan Parishad Election 2026 मराठी Shivsena: ठाण्यातून क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी?, रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता; विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.