Velvet Tops : स्टायलिश अन् रॉयल लूकसाठी ट्राय करा हे वेल्वेट टॉप्स
Marathi May 26, 2026 01:25 PM

कॉलेजला जायचं असो वा ऑफिसला प्रत्येक महिलेला स्टायलिश, कम्फर्टेबल आणि ट्रेंडी दिसायचं असतं. यासाठी बाजारात आलेली प्रत्येक फॅशन फॉलो केली जाते. त्यापैंकी एक म्हणजे वेलवेट टॉप.. फॅशनच्या दुनियेत वेलवेट  हा असा फॅब्रिक आहे, जो कधीच आऊट ऑफ ट्रेंड होत नाही. त्याचा मखमली पोत आणि रॉयल लूक कोणत्याही साध्या आउटफिटला थेट क्लासिक बनवतो. पूर्वी केवळ साड्या किंवा हेवी लेहेंग्यापुरते  हे कापड मर्यादित असायचं परंतू आता मुलींमध्ये वेलवेट टॉप्सची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. आजच्या लेखात जाणून घेऊयात वेल्वेट टॉपचे ट्रेंडी पॅटर्न,

व्ही नेक

व्ही नेक टॉप सध्या कॉर्पोरेट पार्टीजसाठी ट्राय करण्यात येत आहे. हा टॉप तुम्ही जीन्स किंवा पेन्सिल स्कर्टसोबत घालू शकता.

क्रॉप टॉप

प्रतिमा स्रोत: pinterest

हेही वाचा – Lazy Pallu Style: साडीचा पदर चोपून घेणं झालं जुनं; आता ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

वेल्वेचटचा क्रॉप टॉप हाय-वेस्ट जीन्स, शरारा किंवा लेहेंग्यावर जॅकेटसोबत अप्रतिम दिसतो. एथनिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही लूकसाठी हा एक उत्तम ‘इंडो-वेस्टर्न’ पर्याय आहे.

भरतकाम केलेले शीर्ष

प्रतिमा स्रोत: pinterest

वेल्वेटमध्ये एम्ब्रोइडरी केलेले टॉप सुद्धा मिळतात. तुम्हाला ट्रेडिशनल लूक हवा असेल तर हा टॉप प्लाझोसोबत ट्राय करू शकता.

पफ स्लीव्ह टॉप

प्रतिमा स्रोत: pinterest

जर तुम्हाला थोडा विंटेज लूक हवा असेलतर पफ स्लीव्ह्ज असलेला वेलवेट टॉप ट्राय करा. हा टॉप प्लेन जीन्सवर स्टायलिश लूक देतो.

समोर गाठ शीर्ष

प्रतिमा स्रोत: pinterest

फ्रंट नॉट टॉप किंवा टाय अप डिझाइनमुळे टॉपला कॅज्युअल आणि ट्रेंडी लूक मिळतो. हा टॉप कॉलेज किंवा बाहेर जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

सर्व प्रतिमा क्रेडिट: pinterest

हेही वाचा – Oversized Clothes :ओव्हरसाईज कपडे घालताय? पाहा स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.