Mangalwedha Reel Star Ends Life: सोलापुरातील (Solapur News) मंगळवेढ्यात (Mangalwedha Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ करुन फार कमी वेळात प्रसिद्धी मिळवणारी रिल स्टार (Reel Star) रोहिणी नीलेश पाराध्ये (Rohini Paradhye) हिनं अत्यंत धक्कादायक पद्धतीनं आत्महत्या केली आहे. स्वतःच्या हॉटेलच्या ज्या स्वयंपाक घरात तिनं अनेक रिल्स बनवले, त्याच स्वयंपाक घरात गळफास घेऊन रोहिणीनं आपल्या आयु्ष्याचा दोर कापला आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. रोहिणीच्या या टोकाच्या पाऊलामुळे तिचे लाखो चाहते आणि सोशल मीडिया वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथल्या रिल स्टार असणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहिणी आणि तिचे पती निलेश हे दोघेही रिल स्टार म्हणून गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झाले होते. मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी इथे 'हॉटेल ग्रामपंचायत' (Hotel Gram Panchayat) या नावानं दोघांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. या हॉटेलच्या रुपानं दोघांनी अनेक स्वप्न पाहिलेली. दोघांनी मिळून या हॉटेलमधून अनेक रिल्स शूट केलेले. त्यावर त्यांच्या फॉलोअर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही करण्यात आलेला. पण, त्याच हॉटेलच्या स्वयंपाक घरात आत्महत्या करुन रोहिणीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. रोहिणीनं एवढं मोठ्ठ टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन रोहिणीनीनं आत्महत्या केली आहे. रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती तिचा पती निलेश पाराध्ये याला कळताच त्यानं तात्काळ धाव घेतली. त्यानं रोहिणीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला. रोहिणीचा मृत्यू झालेला. रोहिणीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेलं नाही. याबाबत मंगळवेढा पोलीस अधीक्षक तपास करत आहेत.
दरम्यान, रोहिणी आणि नीलेश पाराध्ये हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते. ग्रामीण जीवनशैली, विविध सामाजिक विषय आणि महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती यावर आधारित त्यांचे रील्स नेटीझन्सच्या पसंतीस उतरत होते. ब्रह्मपुरी येथील आपल्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात विविध गावरान खाद्यपदार्थ तयार करतानाचे त्यांचे व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर कमालीचे लोकप्रिय झाले होते.
ABP माझाच्या बातम्या LIVE...