मोबाईलवर बोलण्यासाठी घराबाहेर पडली अन् थेट जंगलात सापडला मृतदेह! अंगावर जखमा अन्..., रायगड हादरलं
गणेश म्हाप्रळकर May 28, 2026 11:43 AM

रायगड : रायगड जिल्ह्यात एकाच महिन्यात ४ खून झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील खरोशी गावाच्या जंगलात एका  १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह (Raigad Crime News) सापडल्याने खळबळ उडाली आहे. निधी राकेश उतेकर असं या मृत तरुणीचे नाव असून ती १५ वर्षाची आहे. आपल्या कुटुंबासोबत निधी ही मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई-वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील (Raigad Crime News) घरोशीवाडी येथे गावी आली होती. सोमवारी रात्री मोबाईलवर बोलण्याकरिता घराबाहेर पडते अस सांगून गेलेली निधी अखेर जंगलात मृत अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निधीच्या या अशा मृत्यूने तिचा खून झाल्याचा संशय आहे. माणगाव पोलिस या घटनेचा अधिक तपास घेत आहेत.(Raigad Crime News)

Raigad Crime News : नेमकं काय घडलं?

निधी राकेश उतेकर ही विलेपार्ले येथील सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत होती आणि नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.सोमवारी (२५ मे) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परत घरी आलीच नाही. कुटुंबीयांनी रात्रभर तिचा शोध घेतला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी (२७ मे) घरोशीवाडी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले.

Raigad Crime News : वृद्ध दांपत्याचा रक्त्याच्या थारोळ्यात मृतदेह...

जंगलात सापडलेल्या मृतदेहावर जखमांचे निशाण होते, निर्जन जंगलभागात सापडलेल्या मृतदेहा वरील जखमा पाहता हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे, 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना असून खालापूर तालुक्यात निगडोली गावात सुद्धा मंगळवारी रात्री एका वृद्ध दांपत्याचा रक्त्याच्या थारोळ्यात मृतदेह सापडला आणि पोलिसांनी हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला, तर महिनाभरापूर्वी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी मध्ये एका तरुणीचा खून करून आरोपी अनिस मोहम्मखान मालदार घटनास्थळावरून फरार झाला होता त्याला तब्बल 6  दिवसांनी बेड्या ठोकल्या होत्या.आता निधीच्या हत्येमागे देखील कोणाचा हात आहे हे पोलिस शोधत आहेत.

या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलीचा जंगलात संशयास्पद मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात रायगड जिल्ह्यात घडलेल्या सलग खूनाच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.