विदर्भात उष्णतेची लाट कायम! तापमानाचा पारा 47 अंशाच्या जवळ, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर May 28, 2026 11:13 PM

Vidarbha Temperature News :  राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे अद्यापही राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे आहे. विशेषत विदर्भात तापमान जास्त आहे. अकोला अमरावती, नागपूर वर्धा या जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे गेल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन कारावा लागत आहे. आज विदर्भातील वर्झा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यात 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

विदर्भात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

अकोला – 45.0°C
अमरावती – 45.2°C
 बुलढाणा – 41.2°C
ब्रह्मपुरी – 45.2°C
चंद्रपूर – 45.4°C
गडचिरोली – 45.0°C
 गोंदिया – 46.1°C
नागपूर – 46.4°C
वर्धा – 46.8°C
वाशीम – 44.0°C
यवतमाळ – 44.4°C

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम असून वर्धा येथे सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर, गोंदिया 46 अंशाच्या पुढे तर चंद्रपूर, अमरावती आणि ब्रह्मपुरी येथे कमल तापमान 45 अंशांच्या पुढे नोंदवले गेले आहे.

नवातापा 2 जुलै पर्यंत असणार 

विदर्भात मागच्या 15 दिवसापासून सलग उष्णतेची लाट सुरु असताना आजपासून नवतापा सुरु होते आहे. नवतापा म्हणजे उन्हाळ्यातील  सर्वाधिक उष्ण नाऊ दिवस, यावेळेस नवतापा 25 मे पासून 2 जुलै पर्यंत असणार आहे. त्यामुळे विदर्भाचा पारा आणखी वर जाणार का ? याची नागरिकांना भीती आहे.

मागील काही दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ 

 
हवामान विभागाने विदर्भात तापमानाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार मागील तीन दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात नवतपाचा प्रकोप सुरू आहे. उष्णतेचा पारा सातत्याने 45 ते 46 अंशाच्या पुढे जात आहे.  उष्णतेच्या लाटेमुळे दिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहत आहे. रात्रीच्याही तापमानात कमालीची वाढ झाली असून उष्ण वारे वाहत असल्याने नागरिकांना रात्री सुद्धा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे. ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 ते 45 अंशावर गेला आहे. यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्णलहरी सुरु असताना गेल्या 48 तासात आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
 

सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.