एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत
Marathi June 01, 2026 10:26 AM

एलपीजी सिलेंडरची दरवाढ : देशभारत महागाईचा भडका उडाला असतानाच पेट्रोल-डिझेल सीएनजीनंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने सर्वसामान्यांची चिंता वाढवणारा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG Cylinder Price Hike) लक्षणीय वाढ केली आहे. देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत हि वाढ करण्यात आली असून परिणामी आता 42 ते 53 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग होणार आहे. राजधानी दिल्लीत 3 हजार 113, तर कोलकात्यात 3 हजार 255 रु. असा नवा दर असणार आहे. तर ५ किलो वजनाचा सिलेंडरही 11 रुपयांनी महाग होणार असल्याची माहीत आहे. 5 किलोचा सिलेंडर आता 821 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, आजपासूनच म्हणजे 1 जुनपासून हि नवीन गॅस दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा चटका सर्वसामान्यांना आता सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, आजपासून (1 जून) लागू (Commercial LPG Cylinder Price Hike Today) झालेल्या या नवीन दरांचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांवर होणार आहे. 19 किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल 42 ते 53 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. परिणामी, वेगवेगळ्या शहरांमध्ये दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आखतात सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता व्यवसायांवर आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. (Commercial LPG Cylinder Price Hike Today)

महिन्याने भरलेलेनंतर पुन्हा मोठी दरवाढ (Commercial LPG Cylinder Price Hike)

बरोबर एका महिन्यानंतर, गॅस कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, 1 मे रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली होती. त्यावेळी थेट 993 रुपयांची वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांकडून केला जातो. याचा अर्थ आता बाहेर जेवण करणे अधिक महाग होणार आहे.

मात्र, दिलासादायक बाब ही आहे की एलपीजी घरगुती सिलेंडरच्या दरात सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ₹913 इतकीच आहे. यामुळे महागाईचा फटका आधीच सोसणाऱ्या लाखो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

LPG Cylinder Crisis : जागतिक ऊर्जा संकटामुळे दरात वाढ

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पश्चिम आशियातील भू-राजकीय अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटामुळे एलपीजीच्या दरात ही दरवाढ करण्यात आली आहे. पुरवठ्यातील व्यत्यय आणि वाढलेल्या आयात खर्चामुळे भारत सध्या ज्या प्रचंड दबावाचा सामना करत आहे, ते यातून दिसून येते.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.