तुम्ही तुमच्याच पायावर दगड मारून घेत आहात, इराणचा पाकिस्तानला मोठा इशारा, थेट..
Tv9 Marathi June 01, 2026 11:45 AM

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून भारताला धक्का देण्याकरिता अमेरिकेसोबत संबंध चांगले करत आहे. हेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान उठ सूट अमेरिकेत जातात. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये मोठा पैसा गुंतवला आहे. मात्र, पाकिस्तानने अमेरिकेसोबत केलेली ही मैत्री त्यांच्यावरच भारी पडणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात देखील पाकिस्तान मध्यस्थी करण्याकरिता मैदानात उतरला होता. मात्र, त्यांना मोठे अपयश मिळाले. अमेरिकेने कोणताही विचार न करता पाकिस्तानला लाथ मारून चर्चेतून बाहेर काढले. फक्त भारतावर दबाव वाढवण्याकरिता पाकिस्तानने अमेरिकेचे पाय धरले आहेत. आता अमेरिकेने पाकिस्तानला आपला खरा मित्र म्हटले. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेली मैत्री पाहून मोठा इशारा इराणने पाकिस्तानला दिला.

फिनलॅडमधील इराणी दूतावासांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी इशारा देत पाकिस्तानला सावध राहण्यास सांगितले. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, पाकिस्तानला खूप जास्त सावधान राहावे लागेल. सर्वात धोकादायक ती वेळ असते, जेव्हा अमेरिका एखाद्या देशाला आपला जवळचा खरा मित्र म्हणते. इतिहास सांगतो की, ज्यावेळी अशा मैत्रीचे दावे केले जातात, त्यावेळी त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

या शब्दांना लक्षात ठेवा आणि स्वत: बघा..  इराणकडून पाकिस्तानला हा इशारा म्हणावा लागेल. अमेरिकेचे रक्षा मंत्री पीट हेगसेथ यांनी सिंगापुरमधील शांगरी ला डायलॉगमध्ये पाकिस्तानचे मोठे काैतुक केले. यादरम्यानच अमेरिकेने मागणी केली की, पाकिस्तानने इस्त्रायलला मान्यता द्यावी. मात्र, इस्त्रायल आणि पाकिस्तानमध्ये वाद आहेत.

इराणने पाकिस्तानला दाखवून दिले की, इतिहासामध्ये अमेरिकेने यापूर्वी अनेकदा पाकिस्तानला धोका दिला आहे. अमेरिकेच्या रक्षा मंत्र्यांनी फक्त पाकिस्तानच नाही तर भारतालाही आपला जवळचा मित्र म्हटले. आशियात चीनची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या काही वर्षात पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारली आहेत. मात्र, काश्मीरचा मुद्द्यात अमेरिकेने दूर राहण्याचा निर्णय घेतला. ज्याने पाकिस्तानकडून यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.