इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरमनप्रीत कौर तिसऱ्या आणि सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चार्ली डीन हीच्या खांद्यावर इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना कधी?इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा सामना मंगळवारी 2 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना कुठे?इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टाँटनमधील द कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.