अंगाला तेल लावून मला गावात सोडून दिलेलं... 'फँड्री'मधील जब्याच्या बहिणीने सांगितला शूटिंगचा अनुभव; म्हणाली, 'ते मला विसरून गेलेले...'
esakal June 04, 2026 11:45 PM

नागराज मंजुळे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. 'फँड्री' असो किंवा 'सैराट' त्यांनी प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजवला. त्यांना जे सांगायचं होतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. जसे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी असतात. तसेच त्यांच्यासोबत काम करणं हेदेखील कलाकारांचं स्वप्न असतं. त्यांनी मातीतल्या अनेक कलाकारांना घडवलं. त्यांच्यासोबत काम करणं हा विलक्षण अनुभव असल्याचं कलाकार सांगतात. असाच एक अनुभव 'फँड्री' चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे हिने सांगितलाय.

ऐश्वर्याने 'फॅन्ड्री' चित्रपटात जब्याच्या लहान बहिणीची सुरेखाची भूमिका केली होती. नुकतीच ऐश्वर्याने द मराठी फाउंडर ला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'मी प्रवीण तरडे सरांच्या अभिनय कार्यशाळेत होते. तिथे मला समजलं की नागराज सरांच्या चित्रपटासाठी ऑडिशन सुरू आहे. मी गेले. खूप ठिकाणी मी तेव्हा बालकलाकार म्हणून ऑडिशन देत होते. माझं सिलेक्शन झालं. पण मी खूप जोरात बोलायचे. तर नागराज सरांनी मला सांगितलं. तुझा भाऊ इथे बाजूलाच बसलाय. त्याच्याशी बोलताना एवढं जोरात कशाला बोलायला हवं. मग मी हळू आवाजात बोलायला लागले. मला पण आश्चर्य वाटायचं तेव्हा की त्यांनी सोमनाथकडून सीन कसे करून घेतले असतील?

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Shinde (@aishushinde)