'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 05, 2026 10:13 AM

Aamir Khan Confirm His Wedding With Gauri: साठी पार केलेल्या आमिर खानच्या (Aamir Khan) तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या ज्या गौरी स्प्रॅटसोबत (Gauri Spratt) आमीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहतोय, तिच्यासोबतच तो आपली लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला. 5 जुलैला दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण, यावर आमीर खान किंवा गौरी स्प्रॅट दोघांपैकी कुणीच कोणतंही भाष्य केलं नव्हतं. अशातच आता आमीर खाननं लग्नाच्या चर्चांना दुजोरा देत, थेट गर्लफ्रेंड गौरीसोबत बोहोल्यावर चढणार असल्याचं सांगूनच टाकलं आहे. 

बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Bollywood Actor Aamir Khan) यानं त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'व्हरायटी इंडिया' (Variety India) सोबतच्या संभाषणात 61 वर्षांच्या आमिर खाननं खुलासा केला की, तो पुढच्या महिन्यात म्हणजेच, जुलैमध्ये त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्याशी लग्न करणार आहे. आमिर खान सध्या अमेरिकेत आहे. गौरी स्प्रॅट, जी आमिरपेक्षा तब्बल 14 वर्षांनी लहान आहे आणि एका सहा वर्षांच्या मुलाची आई आहे, तिच्यासोबत आमिर आपली लग्नगाठ बांधणार आहे. गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची आहे. गौरी बिझनेसवुमन आणि फॅशन इंडस्ट्रीतली तज्ज्ञ आहे. आमिर खाननं गेल्चया वर्षी, म्हणजेच 2025 मध्ये गौरीसोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली होती. आता त्यानं गौरीसोबत लग्न करणार असल्याचंही स्वतःच जाहीर केलंय. आमिर खाननं सांगितलं की, 5 जुलै 2026 रोजी एका खाजगी समारंभात तो पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे.

Aamir Khan, 61, to marry Gauri Spratt on July 5; SRK and Salman may attend  - India Today

गौरीसोबतचं आमिरचं तिसरं लग्न (Aamir Khan Gauri Spratt)

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचं गौरी स्प्रॅटसोबतचं तिसरं लग्न असणार आहे. त्यापूर्वी त्याचं लग्न 1986 मध्ये रिना दत्ता यांच्याशी आणि त्यानंतर डिसेंबर 2005 मध्ये किरण राव यांच्याशी झालेलं. 2021 मध्ये किरण  राव यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर काही काळ आमिर सिंगल होता, पण घटस्फोटाच्या अवघ्या पाचच वर्षांत आमिर खाननं आता तिसऱ्यांना लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. 

आमिर खाननं वर्षाच्या सुरुवातीला, मार्चमध्ये आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं 47 वर्षांच्या गौरी स्प्रॅटची ओळख सर्वांना माझी गर्लफ्रेंड अशी करुन दिलेली. त्यावेळी लग्नाचा विचार नसल्याचं आमिरनं सांगितलेलं पण, आता लग्नाच्या बातमीला दुजोरा देताना आमिर खाननं सांगितलं की, "मी सध्या अमेरिकेत आहे... लग्नाबाबतची बातमी खरी आहे... हे लग्न 5 जुलै रोजी होणार आहे..."

गौरी स्प्रॅट कोण? (Who Is Gauri Spratt?)

गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची असून ती एका अँग्लो-इंडियन कुटुंबातली आहे. तिचे वडील तमिळ-ब्रिटिश आहेत, तर तिच्या आईचा वारसा पंजाबी-आयरिश आहे. तरीही, जेव्हा तिला तिच्या ओळखीबद्दल विचारलं जातं, तेव्हा गौरी स्वतःचा उल्लेख अभिमानानं 'भारतीय' असाच करते. एका संभाषणादरम्यान, आमिर खाननं ही माहिती दिली की, गौरीचे आजोबा मूळचे ब्रिटिश होते. तरीही, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही त्यांच्याबद्दल लेखन केलं आहे.

गौरी प्रोफेशनल लाईफमध्ये काय करते? (Gauri Spratt Profession)

गौरी स्प्रॅट बऱ्याच काळापासून बंगळुरूमध्ये राहत होती आणि ती व्यावसायिकदृष्ट्या Business and Management क्षेत्रांशी जोडलेली आहे. सध्या, ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसशीही संबंधित आहे. दरम्यान, तिला सिनेसृष्टीचा झगमगाट आणि ग्लॅमरपासून दूर राहणंच अधिक पसंत आहे. त्यामुळे ती सार्वजनिक व्यासपीठांवर क्वचितच दिसून येते. तिच्या 'लिंक्डइन' (LinkedIn) प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, गौरीचं शिक्षण 'ब्लू माउंटेन स्कूल'मध्ये झालं आणि त्यानंतर तिनं फॅशनशी संबंधित एक अभ्यासक्रम पूर्ण केला. याव्यतिरिक्त, गौरीनं लंडन येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स'मधून 'स्टायलिंग आणि फोटोग्राफी'मधील FDA अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?

ABP माझाच्या बातम्या LIVE...  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.