KGF Star Yash Wife Buys New Sea Facing Property In Alibaug: दाक्षिणात्य सुपरस्टार यश (South Superstar Yash) या ना त्या कारणानं चर्चेत असतो. बुहुप्रतिक्षित 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात (Ramayana Movie) यश झळकणार आहे. आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असणारा साऊथ सुपरस्टार यश आता एका नव्या कारणानं चर्चेत आला आहे. अभिनेता यश (Actor Yash) यानं कोट्यवधींची नवी मालमत्ता खरेदी केली आहे. यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra News) अलिबाग (Alibaug News) इथे सी-फेसिंग प्रॉपर्टी खरेदी केली आहे. सध्या अलिबागमधील (Alibaug) हा परिसर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचं आवडतं ठिकाण मानलं जातंय. त्यामुळे हा परिसर गेल्या अनेक दिवसांपासूनच चर्चेत आहे. अशातच आता यशनं इथे प्रॉपर्टी खरेदी केल्यामुळे शाहरुख-विराटसह बॉलिवूड सेलिब्रिटींचा (Bollywood Celebrity) तो ऑफिशिअल शेजारी बनला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कमाथ गावात यश आणि राधिका यांनी लागून असलेले दोन कृषी भूखंड खरेदी केले आहेत. या व्यवहाराची नोंदणी 18 मे रोजी झाली असून, या मालमत्तेची किंमत सुमारे 24 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यवहारासाठी त्यांनी 1.44 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. याशिवाय 60 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 5,200 रुपये कागदपत्रांसाठी खर्च करण्यात आले. ही जमीन कृषी स्वरूपाची असून, तिचं सरकारी मूल्यांकन प्रति चौरस मीटर 3,750 रुपये इतकं आहे. दोन्ही भूखंड मिळून एकूण 5,289 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहेत. अलिबागमधील वाढत्या रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर यश आणि राधिका पंडित यांची ही खरेदी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
यश आता शाहरुख-विराट कोहलीचा शेजारी
अलिबागमधील या प्रीमियम परिसरात अनेक नामवंत सेलिब्रिटींची मालमत्ता आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण-रणवीर सिंह, विराट कोहली-अनुष्का शर्मा, सुहाना खान, अमिताभ बच्चन, कार्तिक आर्यन आणि कृती सेनन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींची घरं किंवा गुंतवणूक केलेली मालमत्ता या भागात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अलिबागला सेलिब्रिटींचं आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन म्हणूनही ओळखलं जातं.
दरम्यान, या नव्या मालमत्तेशिवाय सुपरस्टार यश याच्याकडे कर्नाटकमध्ये आलिशान फार्महाऊसदेखील आहे. रिअल इस्टेटमधील त्यांच्या या गुंतवणुकीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
सुपरस्टार यश याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, यश सध्या Toxic या बहुचर्चित सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा सुरुवातीला मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. त्यानंतर त्याची रिलीज डेट जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, निर्मात्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन लांबणीवर टाकलं असून, नव्या रिलीज तारखेची अद्याप घोषणा केलेली नाही. या सिनेमात यश याच्यासोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.