Chandrapur: बंदूक बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
esakal June 06, 2026 03:45 PM

बल्लारपूर: जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शहरातील एका युवकाला देशी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. सलमान खान मजिद खान पठाण (वय २८, रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड) असे आरोपीचे नाव आहे.

४ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपी सलमान खान मजिद खान पठाण याच्या ताब्यातून विनापरवाना बाळगण्यात आलेले एक देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.

Pension Scheme: कामगारांसाठी दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन; काय आहे ही सरकारी योजना? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

जप्त करण्यात आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसांची अंदाजे किंमत ३९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भारताच्या आर. प्रज्ञानंदने Norway Chess चे विजेतेपद जिंकून घडवला इतिहास! १४ वर्षांत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या राजुरा उपविभागीय पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर यांच्या पथकाने केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.