India vs Afghanistan Test: मुल्लनपूरला होत असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध दणक्यात सुरूवात केली आहे. शनिवारपासून (६ जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिलने घरच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) संघात होणारा हा केवळ दुसराच कसोटी सामना आहे. हा सामना वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशीचा (WTC) भाग नसला, तरी आगामी कसोटी सामन्यांसाठी लय मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
IND vs AFG, Playing XI: भारतीय संघाने जिंकला टॉस, रवींद्र जडेजाच्या जागेवर पदार्पण करणारा मानव सुतार कोण?या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल (Yashasvi Jaiswal & KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. अफगाणिस्तानने सुरुवातीला अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राहुल आणि जैस्वाल यांनी संयमी खेळ केला होता. सुरुवातीला जैस्वालचा झेलही सलीमकडून सुटला.
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी ४१ धावांची भागीदारीही झाली होती. पण अखेर १२ व्या षटकात यशस्वी जैस्वालला सलीम साफीने बाद केले. त्याचा झेल अफसर झझाईने घेतला. जैस्वालने ३२ चेंडूत २४ धावा केल्या, ज्यात ५ चौकारांचा समावेश आहे.
दरम्यान, नंतर केएल राहुलला साई सुदर्शनची (Sai Sudharsan) भक्कम साथ मिळाली. तरी १६ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सलीम साफीने चकवले होते. त्याने टाकलेला चेंडू केएल राहुलच्या पॅडला पहिल्यांदा लागला होता. पण त्यावेळी अफगाणिस्तानकडून अपीलच करण्यात आले नाही.
मात्र रिव्ह्यूमध्ये अंपायर्स कॉल दिसत होते. मात्र अपील न केल्याने केएल राहुलला जीवदान मिळाले. त्याचा फायदा घेत त्याने आणि साई सुदर्शन यांनी ५५ धावांची भागीदारी पहिल्या डावात केली.
केएल राहुल आणि साई सुदर्शन यांची ५५ धावांची भागीदारी झालेली असताना पहिले सत्र संपले. त्यावेळी भारताच्या २५ षटकात १ बाद ९६ धावा झाल्या होत्या. केएल राहुल ३७ धावांवर आणि साई सुदर्शन ३२ धावांवर नाबाद होते आता सकाळच्या सत्रातील स्विंग फारसा दुसऱ्या सत्रात मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी पोषक ठरणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना रोखण्याचे आव्हान अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर आहे.
IND vs AFG: आयपीएलच्या रात्रींपासून कसोटीच्या सकाळीपर्यंत; भारतीय खेळाडूंचे ‘जैविक घड्याळ’ बदलण्याची धडपड मानव सुतारचे पदार्पणया सामन्यातून भारतासाठी २३ वर्षीय फिरकी गोलंदाज मानव सुतारला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तो भारतासाठी पदार्पण करणारा ३१९ वा खेळाडू आहे. त्याचा पदार्पणाची कॅप कुलदीप यादवने दिली. याशिवाय अफगाणिस्तानकडूनही नांगेलिया खरोटे याचे पदार्पण झाले आहे. त्यामुळे या सामन्यात दोन पदार्पणवीर खेळत आहेत.