Whatsapp व्हॉट्सॲपवर आता मोकळेपणाने खाजगी गोष्टी बोलता येतील. लवकरच येणारा एक खास फीचर तुमचे मेसेज एकदा वाचले आणि स्वतःहून गायब करेल.
मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी संवेदनशील गोष्टी बोलताना अनेकांना काळजी वाटते की मेसेज कुठे सेव्ह होईल किंवा स्क्रीनशॉट घेतला जाईल. या नव्या सुविधेमुळे ही चिंता मिटणार आहे.
जगभरात सुमारे ३ ते ३.३ अब्ज लोक दरमहा व्हॉट्सॲप वापरतात. फक्त भारतातच तब्बल ८५३.८ दशलक्ष वापरकर्ते आहेत.
चॅटिंग, फोटो-व्हिडिओ शेअर करण्यापासून ते महत्त्वाच्या बातम्या पोहोचवण्यापर्यंत या अॅपचा वापर प्रचंड आहे.
कंपनी आपल्या युजर्सना अधिक चांगला आणि सुरक्षित अनुभव देण्यासाठी सतत नवीन फीचर्स आणत आहे.
Social Media Post Safety Tips : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, एक्स्पर्टनी दिला धोक्याचा इशारा View Once फीचर
सध्या फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओसाठी ‘View Once’ पर्याय उपलब्ध आहे. लवकरच हाच पर्याय टेक्स्ट मेसेजसाठीही येणार आहे.
म्हणजे तुम्ही पाठवलेला मजकूर प्राप्तकर्त्याला फक्त एकदाच दिसेल आणि नंतर तो आपोआप गायब होईल. यामुळे मेसेज पाठवणाऱ्याला आपल्या माहितीवर जास्त नियंत्रण मिळेल.
Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज हे फीचर कसे वापराल?
नव्या फीचरनुसार, सेंड बटण दाबून धरले की ड्रॉप डाउन मेनू उघडेल. त्यात ‘Send as View Once’ हा पर्याय निवडायचा.
ज्याला पाठवला आहे त्याने मेसेज ओपन की तो फक्त एकदा दिसेल आणि लगेच गायब होईल.
स्क्रीनशॉट घेणे, सेव्ह करणे किंवा फॉरवर्ड करणे कठीण होईल. हे फीचर अतिशय संवेदनशील माहिती शेअर करताना उपयुक्त ठरेल.
सध्या काय स्थिती आहे?
प्रसिद्ध वेबसाइट WABetaInfo ने ही माहिती दिली आहे. ही सुविधा Android च्या बीटा 2.26.22.7 मध्ये आली आहे.
सध्या हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे आणि आत्ता तरी सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. कंपनी लवकरच बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे.
Light Bill Saving Tips : रात्रभर AC, फॅन चालवूनही वाढवणार नाही वीजबिल; वापरुन पाहा 'या' 7 पैकी एक ट्रिक स्पॉइलर मेसेजेसचीही चाचणी
याशिवाय व्हॉट्सॲप ‘स्पॉइलर मेसेज’ (spoiler message feature ) फीचरचीही चाचणी करत आहे. यात मेसेज ब्लर दिसेल. प्राप्तकर्त्याला त्यावर टॅप करूनच मजकूर वाचता येईल. OTP, पासवर्ड किंवा खासगी माहिती पाठवताना हे फीचर खूप कामी येईल.
व्हॉट्सॲप गोपनीयतेला प्राधान्य देत असल्याचे हे नवीन अपडेट्स दर्शवतात. लवकरच या फीचर्समुळे अॅप अजून जास्त सुरक्षित आणि मजेदार होणार आहे.