आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
एबीपी माझा वेब टीम June 07, 2026 11:13 AM

Monsoon Maharashtra: देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असून 4 मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon) आता महाराष्ट्राच्या वेशीवर थांबलाय. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम मध्यावर आहे. 5 जूनला गोवा, कर्नाटकातील काही भाग तसेच तमिळनाडू या राज्यांमध्ये मान्सून (Maharashtra Monsoon Update) दाखल झाल्यानंतर येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार असून काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा देखील अंदाज आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 दिवसांत मोसमी वाऱ्यांची वाटचाल राज्याच्या अन्य भागांमध्ये होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. (Maharashtra Monsoon Update)

हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट (Maharashtra Monsoon Update)

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाची स्थिती आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' देण्यात आला असून काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.

Monsoon Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो? 

केरळमध्ये अखेर मान्सून 3 दिवस उशिराने म्हणजेच 4 जून रोजी दाखल झाला असून महाराष्ट्राच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली आहे. पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मान्सून धडकणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिला होता. दरम्यान, विदर्भात मात्र 15 जूनच्या सुमारास मान्सून पोहोचेल, तोपर्यंत तिथला उकाडा कायम राहणार असून वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने झालाय. मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा तो 3 जून रोजी दाखल झाला आहे. याचदरम्यान, हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून धडकला असून यंदा तीन दिवस उशिराने आला आहे. मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. कोकणात सुद्धा 48 तासांत पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. विदर्भात तापमान 40 ते 42 अंशाचा घरात राहील, असं प्रवीण कुमार यांनी सांगितले.

Vidarbha Monsoon : विदर्भात15 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार

मान्सूनच्या अनुषंगाने परिस्थिती अनुकूल आहे. विदर्भात साधारणतः 15 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूप आता पाऊस होईल. मात्र आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल, कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे, असं प्रवीण कुमार म्हणाले. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.