घरगुती गॅस वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ लागू केली आहे. या वाढीनंतर मुंबईत १४.२ किलोचा सिलेंडर सुमारे ९४१ रुपयांवर पोहोचला आहे. वाढीव दर आजपासून लागू झाले असून सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे.
पुणे शहर पाणी कपातीवर दोन दिवसांत निर्णयखडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा कमी होत असताना पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होणार असून, ही बैठक उद्या किंवा परवा होण्याची शक्यता आहे.
यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत एलनिनो वादळाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण हे सरासरीच्या ९० टक्के इतकचे असणार असून, हे पावसाचे प्रमाण सामान्यापेक्षा कमी आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याची तिव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
दहावी बारावी पुरवणी परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून विद्यार्थ्यांना मिळणारपुरवणी परीक्षा 16 जून पासून सुरु होणार असून दहावीची 30 जून पर्यंत तर बारावीचे आठ जुलै पर्यंत चालणार आहे
शाळा महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट घेण्याचे आवहान बोर्डाकडून करण्यात आला आहे
सर्व महाविद्यालयाने ऑनलाईन प्रिंट करून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यायचे आहेत.
यासाठी कुठलेही शुल्क आकारू नये असं बोर्डाने म्हटल आहे
सांगली - "मद्यधुंद वाहन चालकाचा रोडवर थरार! चारचाकीला धडकसांगलीच्या मिरजेत भरदिवसा एका मद्यधुंद सुमोचालकाचा शंभर फुटी रोडवर थरार पाहायला मिळाला, एका चार चाकीला जोराची धडक देत थेट महापालिकेच्या सुशोभित कारंजालाच उडवलं नुकसान केले आहे,यातील काही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.यावेळी सतर्क नागरिकांनी पाठलाग करत मध्यधुंद चालकाला पकडलं आहे.शुभम राजेंद्र गायकवाड असे चालकाचे नावं आहे,हा मद्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन भरधाव वेगाने सुसाट निघाला होता.नशेच्या धुंदीत असलेल्या या चालकाने सुरेश लक्ष्मण नांदरेकर यांच्या चार चाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. एवढ्यावरच न थांबता सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर आदळली. या धडकेत चार चाकी व कारंज्याचे मोठे नुकसान झाले.
अकोल्यात 2 देशी बनावट पिस्टलसह काडतूसे जप्त. लूटमारी करण्यासाठी होत होता पिस्टलचा वापरअकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 'ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केलीय. 2 देशी बनवाट पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केलीये. दरम्यान, अकोला शहरात जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना ही कारवाई केलीय. या प्रकरणात अतिश सूर्यवंशी, अभिषेक डोंगरे आणि सूरज सोनटक्के या तिघांना अटक केली. हे तिघे लुटमारी करण्यासाठी बंदुकीचा वापर करत होते.