MADHURI DIXIT EARLY CAREER LOW BUDGET FILM STORY: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ९० च्या दशकामध्ये माधुरी दीक्षित हिची मोठी क्रेझ होती. तिचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट व्हायचा. अभिनय, नृत्य आणि सौंदर्यामुळे तिची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख होती. दरम्यान करिअरच्या सुरुवातील माधुरीला संघर्ष करावा लागला होता. माधुरीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात निर्मात्यांच्या आग्रहाखारत कमी मानधनात काम केल परंतु कोणतीही सोई-सुविधा नसताना तिने शूटिंग पूर्ण केलय.
माधुरीचा १९८६ साली मानव हत्या सिनेमासाठी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात माधुरी दीक्षित आणि शेखर सुमन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. माधुरी आणि शेखरचा हा दुसराच सिनेमा होता. तेव्हा माधुरी फार नवखी होती. निर्मात्याचं बजेट सुद्धा फार कमी होतं. कलाकरांच्या खर्चाचे सुद्धा पैसे निर्मात्याकडे नव्हते.
दरम्यान काही महिन्यापूर्वी बॉलिवूड बबलला शेखर सुमनने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'मानव हत्या' या सिनेमाच्या सेटवरचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 'माधुरीला त्या सिनेमासाठी पाच हजार मानधन मिळालं होतं. ती देखील नवीन कलाकार होती. तिने देखील माझ्यासोबत सिनेमा करण्यास होकार दिला होता.'
View this post on Instagram
'मी माझा पहिला सिनेमा रेखासोबत केला होता. दुसऱ्या सिनेमात माधुरी माझ्यासोबत होती. त्यामुळे मी माधुरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो. त्यावेळी ती अंघोळीला गेली होती. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ती खूप मोहक आणि तेजस्वी दिसत होती. तेव्हा मी दिग्दर्शकाला मस्करीत म्हणालोही होती, २५०० रुपये मानधन दिले तरी मी हा सिनेमा नक्कीच केला असता. अर्थात ती मस्करी होती'
'सुरुवातीच्या काळात माधुरीला सेटवर आणण्यासाठी निर्मात्यांकडे टॅक्सीचे सुद्धा पैसे नव्हते. त्यांना मला माधुरीला सेटवर आणण्याची जबाबदारी दिली होती. मी तिच्या घरातून सेटवर घेऊन यायचो. सिनेमाचं शुटिंग सुद्धा माझ्याच घरात झालं होतं. कॉस्ट्यूम्स, मेकअप आर्टिस्ट किंवा वाहतुकीचा खर्चही निर्मात्यांना परवडत नव्हता. तेव्हा माझी पत्नी मदतीला आली. तेव्हा माधुरीनं सिनेमात माझ्या पत्नीचे कपडे घातले होते. तसंच तिचा मेकअप सुद्धा तिनेच केला होता' असा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला.
कंगनाच्या आईवडिलांनी तिचे सिनेमे कधीच पाहिले नाही? पहिल्या सिनेमाची आठवण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'त्यांना फक्त बोल्ड सीन्स अन्...'