सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलीय. आता घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. नव्या किंमती आजपासून लागू होणार आहेत. १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर २९ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. LPG Price Hike Adds to Inflation Burden on Families
घरात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किंमतीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. दिल्लीत आता एलपीजी गॅस सिलिंडरचे दर ९४२ रुपये झाले आहेत. तर कोलकात्यात नवे दर ९६८ रुपये आणि मुंबईत ९४१ रुपये इतके झालेत. चेन्नईत एलपीजी सिलिंडरचा दर ९५७.५० रुपयांवर पोहोचलाय.
वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चाकमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १ जून रोजी वाढ करण्यात आली होती. सरकारी तेल कंपन्या सामान्यपणे १ तारखेला किंवा १५ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल करतात. पण अलिकडच्या काही नव्या दराच्या घोषणा पाहिल्या तर त्या ७ तारखेला केल्याचं दिसून येतंय. याआधीही ७ मार्चला घरगुती गॅसच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ केली होती.
सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरचे दर वाढवणं आवश्यक होतं कारण आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीचे दर वाढले आहेत. देशात याची विक्री कमी किंमतीत होत आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्या सबसिडीच्या घरगुती गॅस विक्रीवर मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करत आहेत. कंपन्यांना घरगुती सिलिंडर विक्रीवर तब्बल ७०३ रुपये नुकसान होत होतं. आता दर वाढवल्यानंतर हे नुकसान ४२ रुपयांनी कमी झालं आहे.