Bandar Movie Marathi Actor Fighting Scene Viral: बॉलीवूडमध्ये सध्या बॉबी देओलच्या 'बंदर' (Bandar) चित्रपटाची एकच चर्चा आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या क्राईम थ्रिलर चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol) प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान, या चित्रपटात नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटात काम केलेला एक मराठमोळा अभिनेताही झळकला आहे. बॉबी देओलसोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या चित्रपटातील एक फायटिंग सीन व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांच्या हे लक्षात आलं..हा अभिनेता नागपूरचा असल्याचे कळल्यानंतर प्रेक्षकांनी या व्हिडिओवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे.
बॉबी देओलसोबत फायटिंग सीनमध्ये झळकलेल्या मराठी अभिनेत्याचं नाव अंकुश गेडाम आहे.चित्रपटगृहात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक फायटिंग सिक्वेन्स दाखवलेला आहे. यात जेलमध्ये अभिनेता अंकुशचं पात्र बॉबी देओलच्या पात्राला शिवीगाळ करत मारताना दिसत आहे. बंदर चित्रपटातील स्क्रीनिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत चित्रपटाचे नाव विचारले असून, अंकुशच्या कामाचे कौतुकही केले आहे. काहींनी झुंड चित्रपटातील त्याचे काम आवडल्याचेही लिहिले आहे.
View this post on Instagram
बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेला बंदर चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट लोकप्रिय टीव्ही स्टार समर याच्या आयुष्यभोवती फिरतो. समीर या पात्राची भूमिका बॉबी देओलने केली आहे. समीर मेहराचं आयुष्यात बदलतो जेव्हा त्याची एक्स गर्लफ्रेंड गायत्री ( सपना पब्बी) त्याच्याशी संपर्क तोडल्यानंतर लैंगिक छळाचे आरोप करते. त्यामुळे समरला जेलमध्ये जावं लागतं . एका भ्रष्ट न्यायव्यवस्थेशी संघर्ष करत पुढे जाणारा हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलाय. या चित्रपटात निखिल द्विवेदी यांनी निर्मिती केली आहे. बॉबी देओल, सानिया मल्होत्रा, सपना पब्बी, सबा आझाद, इंग्रजीत सुकुमारन, राज बी शेट्टी, जितेंद्र जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांच्या फळीमध्ये नागपूरच्या अंकुश गेडामचा ही समावेश आहे.