Deool Band 2 Collection : पैसाच पैसा! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' थिएटरमध्ये घालतोय धुमाकूळ; १०० कोटींपासून काही पावले दूर, कमाई किती?
Saam TV June 07, 2026 11:45 AM

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

जगभरात चित्रपटाची कमाई ६० कोटींपार

स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांचे जीवन चित्रपटातून पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचे जीवन आणि स्वामी भक्ती यांचा सुरेख संगम आपल्याला 'देऊळ बंद 2' चित्रपटात पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील गाणी, कथा, कलाकारांचा अभिनय आणि डायलॉग यामुळे सिनेमा खूपच गाजतोय. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री स्नेहल तरडे महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत झळकली आहे. चित्रपटाने शनिवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

View this post on Instagram