बॉलिवूड गाजवणाऱ्या माधुरीनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत का काम केलं नाही? हे होतं कारण
esakal June 07, 2026 12:45 PM

MADHURI DIXIT AND AMITABH BACHCHAN BOLLYWOOD STORY: बॉलिवूडमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. ८०, ९० च्या दशकामध्ये प्रत्येक सिनेमात माधुरी असायची. माधुरी त्याकाळी सगळ्यात टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक होती. तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माधुरीने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट अभिनेत्यांसोबत काम केलं. परंतु तिने दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत कधीच एकत्र काम केलं नाही. नक्की काय कारण असेल जाणून घेऊया...

माधुरी दीक्षितने गोविंदा आणि बिग बींच्या बडे मियाँ छोटे मियाँ या सिनेमात छोटासा कॅमिओ केला होता. परंतु त्या व्यतिरिक्त माधुरी आणि अमिताभ मोठ्या पडद्यावर एकत्र कधीच पहायला मिळाले नाहीत. माधुरी दीक्षितने १९८० च्या दशकात सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात तिला फार यश मिळालं नाही. त्यामुळे अनेक मोठे कलाकार तिच्यासोबत काम करण्यास इच्छुक नव्हते. अशावेळी अनिल कपूर यांच्यासोबत अनेक सिनेमे केले आणि तिला मोठा आधार मिळाला.

त्याकाळी माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. त्यांनी बेटा, तेजाब, परिंदा, हिफाजत यासारख्या सिनेमात एकत्र काम करत बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. काही वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार माधुरीचं करिअर यशाच्या शिखरावर असताना तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु अनिल कपूर माधुरीबाबत खूपच पझेसिव्ह असायचे. त्यामुळे त्यांनी माधुरीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम न करण्याचा सल्ला दिला होता असं म्हटलं जातं.

View this post on Instagram