Suraj Chavan On Fan Incident: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण ( Suraj Chavan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चत असतो. महाराष्ट्रात सुरजला या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. महाराष्ट्रभरात त्याच जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या लग्नाची, त्याच्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलेल्या बंगल्याची तसेच त्याच्या स्टारडमची प्रचंड चर्चा होत असते. अनेक मुलाखतींमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना देवाची उपमा दिली आहे. 'चाहते आहेत म्हणून मी आहे' असं तो अनेक वेळा म्हणालाय. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत. 'इथून पुढे मी चाहत्यांना रात्री कधीही भेटणार नाही. ' असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अनेकजण दारू पिऊन, गुटखा खाऊन घरी येतात, असं म्हणत अलीकडेच फॅन्सकडून झालेल्या एका त्रासाबद्दलही त्याने या मुलाखतीत सांगितलं. हॉट सीट'ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सुरज चव्हाण यांनं चाहत्यांकडून होणाऱ्या त्रासाविषयी सांगितलं. तो म्हणाला ' मी चाहत्यांना यापुढे कधीही रात्री भेटणार नाही. याआधी माझं वेगळं होतं. आता माझं कुटुंब आहे. मी खूप जास्त साधा आहे. आणि मी माझ्या चहात्यांना कायम इज्जत देतो. पण तरीही काहीजण दारू पिऊन माझ्या घरी आले होते. एकाने विमल खाल्लं आणि बाथरूममध्ये तो ओकला; या सगळ्या प्रकारानंतर माझी बायको संतापली होती. ती म्हणाली की तुमचे फॅन्स आता घराबाहेरच ठेवा. मी माझ्या चाहत्यांना खूप जास्त इज्जत देतो, पण ते डोक्यावर बसतात. त्यांनी डोक्यावर नाही तर हृदयात असायला हवं. आता मी चाहत्यांना रात्री भेटू शकत नाही असंही त्याने म्हटलं. तो म्हणाला 'सुरज भाऊ तुम्हाला रात्रीचा भेटणार नाही. घरी सारखं येऊ नका. आता तुम्ही समजून घ्या. "आता अती झालं आहे. मी म्हटलं दादांनी घर दिलं. सोन्याहून पिवळ झालं.एवढ भारी घर दिलं, तिथे मला शांत तरी बसू द्या. माझी अपेक्षा काय आहे, मला शांत होऊ द्या ' असं सुरज म्हणाला.
मी बिग बॉस जिंकून आलो तेव्हा, रात्रभर चहात्यांना फोटो दिले. चहात्यांचं मन कधीही दुखावलं नाही. मी म्हणतो पण आणि मानतो, त्यांना हृदयात ठेवतो. रात्रभर फोटो दिले परत उठलो. नाश्ता करून पुन्हा फोटो दिले.10 दिवस मी असेच घालवलेत फोटो देण्यात कोणाच्याही घरी जायचं म्हटलं तर, आपण विचार करतो की कसं जावं.पण आता चाहत्यांनी विचार केला पाहिजे, त्याच्या घरी आई वडील नाही. आई वडील असताना वेगळं असतं. बाकी सुरज तुमचाच आहे. " असेही तो म्हणाला.