पुणे: राज्यातील ॲप-आधारित कॅब आणि टॅक्सी सेवांचे नियमन करणाऱ्या ‘ॲग्रिगेटर धोरणा’चे नियम निश्चित केले आहेत. यात नागरिकांकडून मागविलेल्या सूचनांचा अंतिम नियमावलीत समावेश केला जाणार आहे. हे काम या महिनाअखेर पूर्ण होऊन येत्या दोन महिन्यांत पुणे आणि मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सुरू होईल. यासाठी सहकारी संस्थांची निश्चिती केली जाणार असून, याचा सभासद होणे अनिवार्य आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून ॲप-आधारित टॅक्सींसाठी कायदेशीर चौकटीची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हे धोरण तयार केले आहे.‘भारत टॅक्सी’चे दर काळी-पिवळी टॅक्सीप्रमाणेच असतील. यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये आकारले जातील.
Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?"कॅब ॲग्रिगेटरचे नियम ठरले असून सूचनांवर विचार सुरू आहे. या महिनाअखेर प्रक्रिया पूर्ण होईल. दोन महिन्यांत सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल."
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
"‘भारत टॅक्सी’साठी चालकांना सहकारी संस्थांचे सभासद होणे आवश्यक आहे. यासाठी तीन संस्थांची निवडही केली आहे. सभासद झाल्यावरच चालकांना नोंदणी करता येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि पारदर्शक भाडे आकारणीला आमचे प्राधान्य आहे."
- राजेश नार्वेकर, परिवहन आयुक्त
बॉलिवूड गाजवणाऱ्या माधुरीनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत का काम केलं नाही? हे होतं कारण प्रवाशांना होणारे फायदेचालकांकडून कमिशन नसल्याने भाडे २० ते ३० टक्के कमी असेल.
राइड रद्द होण्याचे प्रमाण कमी होईल, कारण पूर्ण भाडे चालकाला मिळेल.
ॲपवर दिसणारे भाडेच अंतिम असेल; यात कोणतीही छुपी दरवाढ नसेल.