बीसीसीआयने नुकतीच इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा केलीय. यात टी२० संघात वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी वैभव सूर्यवंशीचा समावेश झाला आहे. त्यानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तुफान फटकेबाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वैभवने अनेक विक्रमही नावावर केले. आता त्याची निवड भारतीय संघात झाल्यानंतर बीसीसीआयला विशेष व्यवस्था करण्याची गरज पडू शकते. वैभव सूर्यवंशीकडे असलेली प्रतिभा, कौशल्य यासह त्याचे वय आणि गरज हेसुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे.
आयर्लंड आणि इंग्लडविरुद्धच्या टी२० मालिकेत वैभव सूर्यवंशीची निवड झालीय. बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १५ वर्षीय असलेल्या वैभवला परदेशातील परिस्थिती आणि वरिष्ठ संघातील वातावरणात मोकळेपणानं वावरता यावं यासाठी त्याच्या आई-वडिलांनाही दौऱ्यात सोबत येण्याची परवानगी देण्यात आलीय.
Suryakumar Yadav: सूर्या टीम इंडियातून आऊट, पण १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी केली भावुक पोस्ट; काय म्हणाला वाचा ...बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी म्हटलं की, वैभव अजून लहान आहे. आतापर्यंत त्याच्या वयाच्या खेळाडूंसोबतच तो प्रवास करत होता. मात्र वरिष्ठ संघातील वातावरण पूर्णपणे वेगळं असेल आणि बीसीसीआयने ठऱवलं आहे की, त्याचे आई-वडील किंवा घरातील एखादा सदस्य त्याच्यासोबत राहू शकतो.
सैकिया म्हणाले की, वैभव अजून खूपच लहान आहे. अंडर १९ मध्ये खेळताना त्याच्या वयाच्या खेळाडूंचा समावेश असायचा. त्यांच्यासोबत खेळायचा आणि प्रवास करायचा. पण भारताच्या वरिष्ठ संघातील सर्व खेळाडू वयस्क आहेत. अशा परिस्थितीत त्याच्यासोबत आई-वडील असणं चांगलं असेल.
सध्या वैभव श्रीलंकेत इंडिया ए संघासोबत तिरंगी मालिका खेळत आहेत. त्याचे वडील लवकरच श्रीलंकेत पोहोचतील. बीसीसीआयने स्पष्ट केलंय की जर इंग्लंड दौऱ्यावरही कुटुंब सोबत येणार असेल तर बोर्डाकडून आवश्यक ती मदत केली जाईल.