Suryakumar Yadav: सूर्या टीम इंडियातून आऊट, पण १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी केली भावुक पोस्ट; काय म्हणाला वाचा ...
esakal June 07, 2026 02:45 PM

Suryakumar Yadav's Heartfelt Message For vaibhav sooryavanshi: भारतीय संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. यासाठी काल ६ जून रोजी टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.अजित आगरकर(ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा केली आहे.

यामध्ये आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारताला नवीन कर्णधार आणि उपकर्णधार मिळाले आहेत. यावेळी भारताचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर याची निवड करण्यात आली असून उपकर्णधारपदी अक्षर पटेलच्या जागी २३ वर्षीय युवा तिलक वर्माची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचीही निवड करण्यात आली आहे. भारतीय निवड समितीने याची घोषणा ६ जून रोजी केली.

Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

या संघात जेव्हा वैभव सूर्यवंशीची निवड झाली, तेव्हापासून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. यामध्ये भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावुक आणि प्रेरणादायी पोस्ट केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

वैभव सूर्यवंशीची भारतीय संघातील निवड ही त्याच्या आयपीएल २०२६ मधील मेहनतीचे फळ आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात या १५ वर्षीय युवा खेळाडूने धडाकेबाज फलंदाजी करत सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याने मोठमोठ्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत या हंगामात तब्बल ७७६ धावा केल्या होत्या.

तसेच या हंगामातील ऑरेंज कॅपही त्याने आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे त्याने या हंगामात ७२ गगनचुंबी षटकार ठोकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या लक्षणीय कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीला भारतीय टी-२० संघात स्थान मिळाले. त्याचबरोबर वैभवने आयपीएल २०२६ मध्ये ५ मोठे पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत.

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. तो भारतीय संघात निवड होणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. सचिनची १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी १६ वर्षे १८१ दिवस वय असताना भारतीय संघात निवड झाली होती. त्यानंतर १६ वर्षे २०५ दिवस वय असताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Vaibhav Suryavanshi: IPL संपायच्या आधीच वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री? गावस्करांनी निवड समितीकडे केली 'ही' मोठी मागणी! काय म्हणाला सूर्या पोस्टमध्ये?

भारतीय संघात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची निवड होताच सूर्याने (सूर्यकुमार यादव) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर भारतीय संघाचा फोटो शेअर करत एका खास इंग्रजी ओळीत त्याचे कौतुक केले. "तू ही संधी तुझ्या कष्टाने मिळवली आहेस आणि तीही अतिशय शानदार पद्धतीने! तुझ्या पुढील क्रिकेट प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे." सूर्या जरी या संघात नसला तरी त्याच्या या पोस्टमुळे त्याने सगळ्यांची मने जिंकली आहेत. तसेच या युवा खेळाडूचे संघात स्वागत करत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.