Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही
esakal June 08, 2026 11:45 AM

आळंदी: संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबीयांना बैलजोडी निवड समितीच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, आळंदी देवस्थानने याबाबत अधिकृत पत्र आणि घोषणा केलेली नसून कोणतेही पत्र दिले नसल्याने तिढा कायम आहे.

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान ८ जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे होणार आहे. ९ जुलैला पालखी आळंदीतून पुण्याकडे मार्गस्थ होताना पालखी रथामध्ये ठेवली जाते. हर्षवर्धन रानवडे यांनी कर्नाटकातून ‘’भीम-अर्जुन’’ खिल्लारी जातीची बैलजोडी साडेसहा ते आठ महिन्यांपूर्वीच साडेसहा लाख रुपयांना खरेदी केली असून त्यांच्याकडून शेतीची नांगरणी तसेच कामे करून घेतली जात आहेत.

तुळशीराम रानवडे यांनी नुकतेच गुरुवारी (ता. ४) हिंजवडी येथून ‘रामा-सूर्या’ ही बैलजोडी सव्वासहा लाखांना घेतली आहे. दोन्ही कुटुंबे बैलांची काळजी घेत असून बैलांना डाळ, गूळ, गव्हाचे पीठ, डबा गूळ, पेंड यांचा खुराक देत असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी करत आहेत.

Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा बैलजोडीसह बसणार उपोषणाला

बैलजोडीचा मान रानवडे कुटुंबाला रोटेशननुसार आला आहे. दोन घरांना हा मान दिला, मात्र पुन्हा पुन्हा त्याच लोकांना मान दिला जातो. मान्यवर लोकांना संधी मिळावी यासाठी निवड समिती आणि आळंदी देवस्थानकडे उमेश रानवडे यांनी याबत पत्र दिले असून योग्य निर्णय घेतला नाही तर गुरुवारी (ता. ११) महाद्वारात बैलजोडीसह उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन दिले आहे. यामुळे बैलजोडीबाबत तिढा कायम आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.