मुंबई: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण कोकणात दाखल झाले असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये नऊ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर, तसेच मॉन्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तराज्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी १५ जूनपर्यंत सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्ायचा अंदाज आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
१२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
सिंधुदुर्गात दमदार हजेरीवैभववाडी : तळकोकणात दाखल झालेल्या मॉन्सूनने मृगाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा व्यापला असून रविवारी संध्याकाळी जिल्ह्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस बरसला. काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पहिल्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले आहे. या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून भात लावणीच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
वादळी पावसाचा राज्याला इशारापुणे : मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रातून तो पुढे सरकलेला नाही. रविवारी मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल ‘जैसे थे’ होती. उद्या (ता. ८) रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा जिल्ह्यांत जोरदार सरींची, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उद्या (ता. ८) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत जोरदार सरींची, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथासरासरी पाऊस ९२ टक्के पडण्याचा अंदाज असला तरी विशेषत: मराठवाडा हा दुष्काळप्रवण भाग आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये, त्यांचे कमीत कमी नुकसान होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री