छत्रपती संभाजीनगर : ‘नीट’ प्रकरणानंतर अधिकाऱ्यांच्या केवळ बदल्या घडवून आणल्या. साधे निलंबनही करू शकत नसेल तर अशी व्यवस्था कुठपर्यंत चालणार’, असा सवाल करीत ‘काॅक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके यांनी ‘कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार आहे, म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,’ असे ठणकावून सांगितले.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तदीपके आज शहरात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण गंभीर आहे. देशातील एक कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले गेले. ‘नीट’च्या सहा-सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आई-वडिलांना काय वाटत असेल? याची जबाबदारी कोणाची? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे; अन्यथा पंतप्रधानांनी स्वत: जबाबदारी घ्यावी. प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही पुन्हा मैदानात उतरून आंदोलन करणारा आहोत,’’ असेही ते म्हणाले.
‘‘आजचा तरुण सरकारला घाबरत नाही. पण, देशात आज प्रश्न विचारणारे, सरकारला आव्हान देणाऱ्यांना पाकिस्तानी ठरवले जात आहे. सरकारविरोधात बोलले की विद्यार्थी, विरोधक, पत्रकार अशांना पाकिस्तानी ठरवण्याची नवी नीती आहे. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत व्यवस्था सुधारणार नाही,’’ असे आवाहन त्यांनी केले.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा ‘जय भीम’ची घोषणा ही अराजकता आहे का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपके यांच्या आंदोलनाबाबत ‘अराजकता’ असा शब्द वापरला होता. याबाबत दीपके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक अराजकी असतात का? ‘जय भीम’ची घोषणा देणे अराजकता आहे, असे फडणवीस यांना म्हणायचे आहे का,’’ असा प्रश्न करून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विधान लज्जास्पद असल्याचे म्हटले.