मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?
esakal June 08, 2026 04:45 PM

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा केलीय. यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची सुनील तटकरे यांनी भेट घेतली. तर राजेंद्र जैन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, इतरांना न्याय मिळाला तसा मलाही मिळावा अशी मागणी होती असं म्हणत मनातली खदखदही त्यांनी बोलून दाखवली. Chhagan Bhujbal Breaks Silence on NCP Rajya Sabha Decision

माझीही मागणी होती की माझ्या मुलाला मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. पण ते वरती सांगायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याबाबत भाजपकडे प्रस्ताव मांडल्यानंतर मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण होईल तेव्हा विचार करू असं सांगण्यात आलंय. भाजपने नकार दिला यात तथ्य नाही असं मंत्री भुजबळ म्हणाले.

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

नाराजीच्या चर्चा फेटाळून लावताना भुजबळ म्हणाले की, आपण नाराज नाही. मात्र इतरांना जसा न्याय मिळाला तसा मला मिळायला हवा ही मागणी होती. इतरांचे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि राज्यात मंत्रिमंडळात लोक आहेत. मीसुद्धा पवारसाहेबांसोबत पक्षस्थापनेत पुढाकार घेतलाय. त्यामुळे माझी मागणी होती.

न्याय मिळावा अशा मागणीनंतर तुमच्यावर अन्याय झाला का? असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, अन्याय काय आहे... चालायचंच.. आज नाही तर उद्या, किंवा पुन्हा कधीतरी... मी कबड्डीचा खेळाडू आहे. बुद्धीबळाचा नाही.

सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर चर्चेनंतर राजेंद्र जैन यांची उमेदवार असणार आहेत. पक्षाने एकमताने हा निर्णय घेतलाय. छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळसाहेब संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत. दादांनी नि्रणय घेतल्यानंतर भुजबळ साहेबांचंही तेवढंच योगदान आहे. त्यांचं ज्येष्ठत्व, अनुभव पक्षाला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय आम्ही घेणार आहोत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.