मसूर: किवळ (ता. कऱ्हाड) येथील चार होतकरू युवकांनी पोलिस दलांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. राज्यभरातील हजारो उमेदवारांमधून कठोर स्पर्धा पार करत अक्षय विजय साळुंखे व आदित्य संजय साळुंखे यांची मुंबई शहर पोलिस दलात निवड झाली आहे,
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्ततर सुयोग शिवाजी थोरात याने पुणे कारागृह पोलिस दलात यश मिळवले असून, समाधान अर्जुन कोळी याची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड झाली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे.
शारीरिक तयारी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या सर्व टप्प्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. त्यांच्या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ, नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि अविरत परिश्रम यांचा मोठा वाटा आहे.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथाविशेष म्हणजे, किवळ गावात गेल्या सलग चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी चार ते पाच युवक-युवती पोलिस दल, लष्कर, तसेच विविध शासकीय सेवांमध्ये निवड होत आहेत. त्यामुळे गावात स्पर्धा परीक्षांचे आणि शासकीय सेवांचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.