जेवणासाठी बाहेर पडला, अटल सेतूवर कार उभी केली अन्… तीन तासापासून भर समुद्रात शोधाशोध; नवी मुंबईतील तरुणाचे टोकाचे पाऊल
Tv9 Marathi June 08, 2026 11:45 PM

अटल सेतुला हा देशातील सर्वात मोठा समुद्रावरील सागरी सेतू आहे. या सेतुच्या उभारणीनंतर सीएमएमटीतून म्हणजे दक्षिण मुंबईतून नवीमुंबईला २० मिनिटात पोहचला येते. हा इंजिनिअरिगचा उत्कृष्ट नमूना असलेला हा ब्रिज आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत येत आहे. या पुलावर एका तरुणाने कार उभी केली आणि त्याने समुद्र पाहण्याच्या निमित्ताने थेट समुद्रात उडी मारल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांना शोध मोहिम सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक सुभाष रासकर ( वय 28 ) हा तरुण रविवारी ( 7 जून ) पहाटे 1.29 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवर गेला आणि त्याने तेथे कार थांबवून समुद्रात उडी मारली. या प्रकरणात त्याच्या नातेवाईकांनी तो हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रतिक याला समुद्रातून शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 48/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक रासकर हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. घटनेपूर्वी त्याने आपल्या कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आपली कार अटल सेतूवर उभी करून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर उघडकीस आली आहे.

शोधमोहीम सुरू

घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. प्रतिक याने समुद्रात उडी मारल्यानंतर या तरुणाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलीस, सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून परिसरात कसून शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रतिक रासकर याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.या तरुणाचे वर्णन पोलिसांनी जाहीर केलेले आहे. त्यानुसार त्याचा रंग गोरा, शरीरयष्टी मजबूत, उंची अंदाजे 5 फूट 10 इंच, काळे वाढलेले केस, काळे डोळे तसेच थोडी वाढलेली दाढी-मिशी आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.