रुशीलच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, शवविच्छेदन अहवालानंतर चित्र होणार स्पष्ट
Marathi June 09, 2026 11:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शनिवारी वरळीच्या एनएसीआय डोममध्ये आयोजित कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या रुशील गांगुर्डे या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पण रुशीलचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तो फिट होता, त्याच्या रक्त चाचणीत मद्य आढळून आलेले नाही असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याचे समजते. त्यामुळे रुशीलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा ताडदेव पोलीस तपास करीत आहेत.

वरळी डोममध्ये संगीत कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. त्यात माहीम येथे मोठा भाऊ व बहिणीसोबत राहणारा रुशील हा त्याच्या मित्रांसह सहभागी झाला होता. रूशील याला ब्रिच कॅन्डी तर तरुणीला जसलोक इस्पितळात नेण्यात आले. मात्र रुशीलला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही बाब कळताच रुशीलचा मोठा भाऊ डॉक्टर तनय गांगुर्डे यांनी इस्पितळात धाव घेतली आणि त्यांनी डॉक्टरांकडे विचारपूस  केली असता रुशील यास इस्पितळात दाखल केल्यावर तो उपचारास प्रतिसाद देत नव्हता. त्याच्या हृदयाचे ठोके व रक्तदाबाच्या नोंदी मिळत नव्हत्या व त्याचे  शरीर निळे पडले होते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रूशील हा फिट होता, असे डॉ. तनयचे म्हणणे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.